1.3 C
New York
Thursday, January 9, 2025

Buy now

spot_img

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी; पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

 

बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठवण वाजेपासून सुरु होईल, पहिला निकाल परळीचा तर सर्वात शेवटचा निकाल आष्टी मतदार संघाचा लागेल अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी पार पडली. बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. पाच ते सहा ठिकाणी अप्रिय घटना घडल्या. त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

मतमोजणी प्रक्रिया 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरु होईल. प्रत्येक ठिकाणी 14 टेबल वर ही प्रक्रिया सुरु होईल. सुरवातीला तपाली मतमोजणी होईल, त्यानंतर इव्हीएम मशीन वरील मतमोजणी सुरु होईल.

 

मतदान प्रक्रिया दरम्यान अनेक ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. पिण्याचे पाणी, प्रसाधन गृह, निकृष्ट जेवण, लाईट ची सुविधा नव्हती. बीडच्या उपजिल्हाधिकारी कविता जाधव आणि गेवराईचे धुमाळ यांनी शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना जी अपमानस्पद वागणूक दिली त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती पाठक यांनी दिली.

 

बीड, माजलगाव, गेवराई या ठिकाणी 29 फेऱ्या होतील. तर आष्टी मध्ये सर्वाधिक 34 फेऱ्या होतील. केज आणि परळी या ठिकाणी 28 फेऱ्या होतील. सर्वात पहिला निकाल हा परळीचा अपेक्षित असून शेवटचा निकाल आष्टीचा लागेल.मतमोजणी प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशी माहिती पाठक यांनी दिली.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles