-2.6 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेने एका वर्षात बेकायदा तब्बल २ कोटी ७ लाख ३१ हजार रुपये कमाविले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

इंदापूर येथे राहत असणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाने एका वर्षात बेकायदा तब्बल २ कोटी ७ लाख ३१ हजार रुपये कमाविल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. त्याच्यावर अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिभाऊ नारायण खाडे तत्कालीन पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, बीड (रा. विकासवाडी, पो. रेडणी ता. इंदापूर, जि. पुणे) आणि त्याची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांची बीडमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध १६ मे २०२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश मिळाले होते.

 

उघड चौकशी दरम्यान परीक्षण कालावधीमध्ये म्हणजे १० ऑगस्ट २०२३ ते १६ मे २०२४ कालावधी या दरम्यान हरिभाऊ खाडे याने त्याचे सेवा कालावधीतील परिक्षण काळात सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळणार्‍या उत्पन्नापेक्षा २ कोटी ७ लाख ३१ हजार ३५८ रुपये (११६.२८ टक्के) रक्कमेची अपसंपदा संपादित केली असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी त्याची पत्नी मनिषा खाडे हिने सुमारे ६२ लाख ७९ हजार ९५३ रुपयांची मालमत्ता स्वत:च्या नावावर धारण करुन हरिभाऊ खाडे याला अपसंपदा संपादित करण्यासाठी सहाय्य केल्याचे उघड चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी ही कारवाई केली आहे़. पोलीस निरीक्षक किरण बगाटे पुढील तपास करीत आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles