• सहाही मतदारसंघात २३ नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी
बीड |
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २२ लाख २७ हजार ८४४ मतदारांपैकी १५ लाख ३४ हजार ४३६ म्हणजेच ६८.८८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बुधवारी (ता.२०) बजाविला. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील मतदानांची मोजणी शनिवारी (ता.२३) होणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश पाठक यांनी सांगितले.
गेवराई मतदारसंघात ७२.७२ टक्के, माजलगाव ६७.२४, बीड ६२.१८, आष्टी ७३.०५, केज ६३.४८ आणि परळी मतदारसंघामध्ये ७५.२७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान परळी विधानसभा मतदारसंघात झाले.
गेवराई मतदारसंघात एक लक्ष ९९ हजार ८८९ पुरूष मतदार, १ लक्ष ८० हजार १७ महिला, इतर ३ असे एकूण तीन लक्ष ७९ हजार ९०९ मतदार आहेत. तर माजलगाव मतदारसंघामध्ये १ लक्ष ८५ हजार ८०६ पुरूष, १ लक्ष ६६ हजार ४७२ महिला, इतर १ असे एकूण ३ लक्ष ५२ हजार २७९ मतदारांनी, बीडमध्ये दोन लक्ष दोन हजार ७२० पुरूष, १ लक्ष ८१ हजार ३७२ महिला व इतर ९ असे एकूण ३ लक्ष ८४ हजार १०१, आष्टीतील दोन लक्ष पाच हजार ३५६ पुरूष, एक लक्ष ८१ हजार एक महिला, इतर १ असे एकूण तीन लक्ष ८६ हजार ३५८, केजमध्ये दोन लक्ष दोन हजार ६२० पुरूष, एक लक्ष ८४ हजार ५९५ महिला, इतर सहा असे एकूण तीन लक्ष ८७ हजार २२१ आणि परळीमध्ये एक लक्ष ७६ हजार ५० पुरूष, एक लक्ष ६१ हजार ९२२ महिला व ४ इतर असे एकूण तीन लक्ष ३७ हजार ९७६ असे एकूण मतदार आहेत.
असे झाले मतदान
- गेवराई मतदारसंघात एक लक्ष ४७ हजार १२४ पुरूष, एक लक्ष २९ हजार १५७ महिला, इतर २ असे एकूण दोन लक्ष ७६ हजार २८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर माजलगाव मतदारसंघात एक लक्ष २६ हजार ५५५ पुरूष, एक लक्ष १० हजार ३२४ महिला, एक इतर असे एकूण २ लक्ष ३६ हजार ८८० मतदारांनी,
- बीडमध्ये एक लक्ष २८ हजार ३११, बीडमध्ये एक लक्ष १० हजार ५३१, इतर ३ असे एकूण २ लक्ष ३८ हजार ८४५,
- आष्टीमध्ये १ लक्ष ५२ हजार १७१ पुरूष, १ लक्ष ३० हजार ७५ महिला असे एकूण दोन लक्ष ८२ हजार २४६ मतदारांनी,
- केजमध्ये एक लक्ष ३० हजार ८५४ पुरूष, एक लक्ष १४ हजार ९४३ महिला आणि इतर २ असे एकूण दोन लक्ष ४५ हजार ७९९
- आणि परळी विधानसभा मतदारसंघामध्ये १ लक्ष ३६ हजार १५५ पुरूष, १ लक्ष १८ हजार २२८ महिला असे एकूण २ लक्ष ५४ हजार ३८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.