0.1 C
New York
Sunday, January 12, 2025

Buy now

spot_img

लग्नानंतर शारीरिक संबंध न ठेवणे ही मानसिक क्रुरता, पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पुणे |

लग्नानंतर जोडीदारासोबत कोणत्याही ठोस कारणाशिवाय शारीरिक संबंध न ठेवणे क्रुरताच असल्याचा निष्कर्ष काढत कौटुंबिक न्यायालयाने पतीने केलेला घटस्फोटासाठीचा अर्ज मंजूर केला.प्रमुख न्यायाधीश हितेश गणात्रा यांनी हा निकाल दिला.

वैभव आणि वैभवी (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. दोघांचा एप्रिल 2020 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर ती नांदण्यास सासरी गेली. मात्र, तिने पतीसोबत शरीर संबध ठेवण्यास नकार दिला. ती वारंवार माहेरी जात असत. पतीला तिच्या चारित्र्याबद्दल संशय येत होता. दरम्यान पत्नीचे नात्यातील व्यक्तीसोबतचे चॅटींग मिळाले. त्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर पत्नी पळून गेली. पळून जाताना तिने जाताना चिठ्ठी लिहली होती. त्या चिठ्ठीद्वारे पतीने पोलिसात पत्नी हरविल्याची तक्रार दिली.

दरम्यान पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. त्यावेळी मी मर्जीने घर सोडून गेले होते. नात्यातील व्यक्तीसोबत दोन दिवस लॉजवर राहिले. मला पतीबरोबर संसार करायचा नाही’ असा जबाब दिला. तर त्या नात्यातील व्यक्तीने दोघे सोबत गेल्याचा जबाब दिला. त्यामुळे पतीने मानसिक क्रूरतेच्या कारणाखाली घटस्फोट मिळण्यासाठी डिसेंबर 2021 मध्ये अ‍ॅड. के. टी. आरू-पाटील यांच्या वतीने कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. या प्रकरणात पत्नीचे नात्यातील व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचे फोनच्या चॅटवरून लक्षात आणून दिल्याचे कारणही घटस्फोटासाठी महत्त्वपूर्ण ठरले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles