मुंबई |
येत्या १४ मार्च रोजी सरकार कोसळणार असल्याचं माहिती झाल्यानंतर सरकारने अर्थसंकल्पात केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. आपण पुन्हा सत्तेत येणार नाही, हे सत्ताधारी पक्षाला माहिती होतं.त्यामुळे अर्थसंकल्पात मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणीवर येत्या १४ तारखेला निकाल लागणार आहे. त्यामुळे सध्याचं सरकार येत्या १४ तारखेला कोसळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. त्यावर येत्या १४ तारखेला सरकार कोसळणार नाही. त्यावेळी राज्यात मोठा भुंकप होऊन अनेक नेते पक्ष प्रवेश करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या एकच खळबळ उडाली आहे.
आमचे सरकार बोलायचीच कढी आणि बोलाचाच भात नाही. आम्ही तोंडाच्या वाफा काढत नाहीत. कसब्याच्या गेल्या चार निवडणुकीत आम्हाला जेवढी मते मिळाली होती. तेवढीच मते यावेळीही मिळाली आहेत. विजयासाठी चार टक्के मते कमी पडली आहेत. आम्ही आमची ताकद वाढवत आहोत. २०२४ मध्ये स्वत: संजय राऊत हे आमचं अभिनंदन करतील. असंही बावनकुळे म्हणाले.