3.1 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

शरद पवारांना धनंजय मुंडेंची भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी?’- धनंजय मुंडे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

परळी |

 

‘शरद पवारांना धनंजय मुंडेंची भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी?’, असा प्रश्न विचारत अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांना थेट इशारा दिला आहे.त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

 

मुंडे कुटुंबियांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या परळीत शरद पवार यांनी थेट मराठा उमेदवार देऊन धनंजय मुंडेंसमोर आव्हान निर्माण केलं आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाकडून येथील निवडणूक प्रतिष्ठेची कऱण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच अर्थाने या निवडणुकीची चुरस वाढली आहे. यावरून धनंजय मुंडेंनी शरद पवारांवर टीकास्त्र डागले आहे. ते परळी येथे स्नेह मिलनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

 

 

 

 

‘जर मी एवढ्या लहान कुटुंबात, लहान जातीत जन्माला आलो असेल, तर का कुणाला एवढी भीती वाटायला पाहिजे? शरद पवारांना धनंजय मुंडेंची भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी?’, असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे. लोकसभेत पंकजाताईंचा पराभव केला तसा धनंजय मुंडेंचाही पराभव करण्यासाठी व्यूहरचना केली आहे का, परळीत दहशत आहे, असे म्हणून जर कोणी या मातीच अपमान करत असेल तर धनंजय मुंडे हे काधीही सहन कऱणार नाही. आता तुम्हीच सांगा परळीत माझी दहशत आहे का, सगळ्यांना वाकून बोलून नमस्कार घालून मेलोय अन् आता म्हणतात मी दादागिरी करतो, जर व्यापाऱ्यांच्या व्यवसायात कुणी आडवं येत असेल तर त्याची गाठ माझ्याशी असेल, असा इशाराही धनंजय मुंडेंनी दिला आहे.

 

 

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हेदोघे भाऊ-बहीण एकत्र आले आहेत. त्यामुळे परळीतील राजकीय समीकरणेही बदलली आहेत.

 

 

 

पण तरीही यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मुंडे भाऊ-बहिणीला ही निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे शरद पवारांनी धनजंय मुंडेंविरोधात दिलेला उमेदवार. राजेसाहेब देशमुख हे मराठा उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र लढूनही काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. त्यामुळे 2024 ची विधानसभा निवडणूकही तितकीच ताकदीची आणि चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles