0.1 C
New York
Sunday, January 12, 2025

Buy now

spot_img

मासिक पाळी प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून दखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

महिलेच्या सासरच्यांनी जादुटोणा करण्यासाठी सुनेचं मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची महिला आयोगानेही दखल घेतली असून आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी आपण सर्वांनी जागतिक महिला दिवस साजरा केला. मात्र, पुण्यातील घटना बघता अजूनही महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात सुरू असलेला लढा आणखी किती दिवस लढावा लागेल, हा प्रश्न पडतो, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली. तसेच पुण्यातील या घटनेबाबत महिला आयोग पाठपुरावा करेन आणि आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. याबरोबरच समाजात अशा प्रकारे घटना घडू नये, यासाठी सातत्याने अनिस आणि इतर संघटनांच्या मदतीने महिला आयोगाकडून जनगागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

https://patodasanchar.com/561/

नेमकं काय आहे प्रकरण?

मासिक पाळी सुरू असताना महिलेचा छळ करून अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, महादू कणसे (सर्व रा. बीड) यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिला विवाहानंतर बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. पतीसह नातेवाईकांनी तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. मासिक पाळी दरम्यान आरोपींनी संगनमत करुन महिलेशी अघोरी कृत्य केले, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. छळामुळे महिला माहेरी निघून आली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles