बीड |
बीड शहरातून स्विफ्ट कार मधून एक लाख रुपयांची रोख रककम घेऊन जात असताना गस्ती पथकाच्या तपासणी दरम्यान संबंधित गाडीचालकला सदरील रक्कमेबाबत समाधानकारक खुलासा सादर करता आला नाही. त्यामुळे सदरील रु. एक लक्ष रक्कम जप्त करण्यात आली आहे.
230-बीड विधानसभा मतदार संघामध्ये 03.11.2024 रोजी रात्री 1.30 च्या दरम्यान एफएसटी (गस्ती) पथकाच्या तपासणी दरम्यान शिवराज पान सेंटर जवळ गाडी क्र. MH 12 FY 7994 (स्विफ्ट कार) मध्ये रु 1.00 लक्ष रुपयांची रक्कम आढळून आली. संबंधित गाडीचालक यांना सदरील रक्कमेबाबत समाधानकारक खुलासा सादर करता आला नाही. त्यामुळे सदरील रु. एक लक्ष रक्कम जप्त केल्याचे बीड निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती कविता जाधव यांनी कळवले आहे. एफएसटी (गस्ती) पथक क्र.07 पथक प्रमुख श्री. लोकरे व त्यांच्या टीमने ही कार्यवाही केली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौजे घाटसावळी, चौसाळा व राजुरी नवगण येथे स्थिरपथक स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच 9 एफएसटी (गस्ती) पथके कार्यरत असून सदरील पथकामार्फत दिवसा व रात्री वाहनाची तपासणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी कळवले आहे.
आता पर्यन्त जिल्ह्यात सात लाख रुपयांची रोख रक्कम आणि ४० हजार रुपयांचां दारू साठा तसेच गांजा जप्त करण्यात आला आहे.