-2.3 C
New York
Friday, January 10, 2025

Buy now

spot_img

सतत डावलले जात असल्याने‎ रिपाइं (आठवले गट) नाराज, महायुतीचा प्रचार करणार नसल्याची भूमिका

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

रिपाइं (आठवले) व भारतीय जनता ‎‎पार्टीची गेल्या दहा वर्षांपासून युती‎ आहे. तरीही रिपब्लिकन पक्षाला ‎‎महायुतीमध्ये अजिबात सन्मान‎ मिळत नसून लोकसभा व ‎‎विधानसभेमध्ये पक्षाला एकही जागा ‎‎मिळाली नाही.पक्षाला वारंवार‎ डावलले जात आहे. या‎ पार्श्वभूमीवर रिपाइंच्या‎(आठवले) विदर्भातील‎ कार्यकर्त्यांनी आम्ही आठवले ‎यांच्या रिपब्लिकन पक्षासोबत ‎आहोत, पण या निवडणुकीमध्ये ‎भाजपासोबत राहणार नाही, अशी‎ आक्रमक भूमिका घेतल्याची ‎माहिती राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎थुलकर यांनी दिली.‎ पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना‎ तसे पत्रही लिहिले आहे.‎

 

नुकत्याच ३०-३२ महामंडळाच्या ‎अध्यक्ष व सदस्य पदांच्या नियुक्त्या‎ केल्या. त्यात पक्षाला स्थान नाही. तर‎ विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त ‎७ सदस्यांच्या नियुक्त्या झाल्या व‎ पाच जागा रिक्त ठेवण्यात आल्या.‎पण रिपाइंचा विचार केला गेला नाही.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ 28 तारखेला भाजप उमेदवारांनी‎ नागपूरच्या संविधान चौकातील डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला‎ माल्यार्पण करीत असताना त्या पवित्र‎ ठिकाणी गरज नसताना चुकीच्या ‎घोषणा दिल्या. पण उमेदवारांनी साधी‎ दिलगिरी व्यक्त केली नाही. त्यामुळे ‎कार्यकर्त्यांमध्ये व‎ आंबेडकरी-रिपब्लिकन जनतेमध्ये‎ प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.‎

 

आरएसएस स्वयंसेवक, रिपाइंचे उमेदवार कसे?‎

 

भाजपने कलिनाची जागा रिपाइंला सोडल्याची घोषणा केली. आठवलेंनी‎ त्याप्रमाणे जाहीर केले. त्या जागेवर अमरजित सिंह यांनी भाजपतर्फे “कमळ”‎या चिन्हावर भाजपचा ए. बी. फॉर्म लावून अर्ज भरलेला आहे. ते भाजपचे ‎उपाध्यक्ष असून आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक आहेत. ते रिपाइंचे उमेदवार‎ कसे असू शकतात? हा प्रश्न रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केला आहे.‎

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles