‘ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षाने विधानसभा निवडणूक उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्या ठिकाणी ते उमेदवार मागे घेणार. अशी मला अपेक्षा आहे.’, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे शहरात दाखल झाले. आपल्या पुणे शहर दौऱ्यातून दरम्यान देवेंद्र फडणवीस हे पुणे शहरातील वेगवेगळ्या नेते मंडळींची आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांनी महायुतीमधील बंडखोरीबाबत मोठं विधान केले.
‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात निवडणुकीसाठी पोलिस सुरक्षित पैशाची वाहतूक होत असे, असं एकूण तुम्ही ऐकून आहे. मात्र त्यांनाच आता असे भास होत असल्याने ते असे आरोप करत आहेत.’ असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले आहे. तसंच, ‘जयंत पाटील यांना तुम्ही कधीच सिरीयसली घेऊ नका, ते नेहमी मस्करीच्या भूमिकेमध्ये असतात.’, असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळा फाईल वरून माध्यमांना दिला आहे.
‘भाजपाचे बंडखोर उमेदवार गोपाळ शेट्टी हे नेहमी पक्षासाठी हिताचे निर्णय घेतात आणि ते सदैव पक्षासोबत असतात. आता ह्या विधानसभा निवडणुकीत देखील ते पक्ष हिताचे निर्णय घेतील.’ हा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये भाजपला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज न मिळाल्यामुळे गोपाळ शेट्टी हे नाराज झाले होते. त्यांनी बंडखोरी करत बोरिवलीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी गोपाळ शेट्टी यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. पण ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अशामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी हे पक्ष हितासाठी निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला.