भाजपची तिसरी यादी जाहीर झाली आहे. 25 विधानसभा मतदारसंघातील जागांसाठी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आष्टीमध्ये अजित पवार गटाच्या आमदाराला मोठा धक्का देण्यात आला आहे.आष्टी पाटोद्याचे सध्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांचे तिकीट कट करण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी महायुतीकडून भाजपचे सुरेश धस यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपने केला होता दावा
भाजपकडून गवेराई विधानसभा मतदारसंघाच्या बदल्यात आष्टी – पाटोदा मतदार संघावर दावा करण्यात आला होता. त्यासंदर्भात काही दिवसांपासून हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे बाळासाहेब आजबे यांचा पत्ता कट केला जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर ती चर्चा खरी ठरली आहे.
बंड होण्याची शक्यता
सुरेश धस यांना संधी देण्यात आल्यामुळे आष्टीमध्ये बंड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बाळासाहेब आजबे यांनी नेहमीच आपला मतदारसंघ ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा आता बाळासाहेब आजबे काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे.
भाजपची तिसरी यादी
मुर्तिजापूर – हरिश पिंपळे
कारंजा – सई डहाके
तेओसा -राजेश वानखेडे
मोर्शी – उमेश यावलकर
आर्वी – सुमित वानखेडे
कटोल – चरणसिंग ठाकूर
सावनेर – आशिष देशमुख
नागपूर मध्य – प्रवीण दटके
नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले
नागपूर उत्तर – मिलिंद माने
साकोली – अविनाश ब्राह्मणकर
चंद्रपूर – किशोर जोरगेवार
आर्णी – राज तोडसाम
उमरखेड – किशन वानखेडे
देगलूर – जितेश अंतापूरकर
दहानू – विनोद मेढा
वसई – स्नेहा दुबे
बोरीवली – संजय उपाध्याय
वर्सोवा – भारती लव्हेकर
घाटकोपर पूर्व- पराग शाह
आष्टी – सुरेश धस
लातूर शहर -अर्चना चाकूरकर
माळशिरस – राम सातपुते
कराड उत्तर – मनोज घोरपडे
पलुस कडेगाव – संग्राम देशमुख