बीड |
बीड विधानसभा मतदारसंघातुन विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे निवडणूक लढवतील अशी घोषणा केली आहे .आता बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार )विरुद्ध शिवसेना (शिंदे )आणि जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवार अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसापासून ज्येष्ठ नेते शरद पवार हे कुणाला उमेदवारी देतात याबाबत उत्सुकता ताणली गेली होती ,त्यातच राष्ट्रवादी पक्षाने बोलावलेल्या इच्छुकांच्या बैठकीस संदीप क्षीरसागर हे उपस्थित राहू शकले नव्हते ,मात्र नंतर त्यांनी स्वतंत्रपणे पवारांची भेट घेतली होती .राष्ट्रवादीकडून ज्योतीताई मेटे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हेही इच्छुक होते पण पुन्हा एकदा शरद पवार यांनी तरुण आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर बीड विधानसभा मतदारसंघ लढवण्याची आणि तो जिंकण्याची जबाबदारी सोपवली आहे संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीचे महाआघाडी कडून स्वागत करण्यात आले आहे.