मुंबई |
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ या वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना अनेक नवीन योजनांची घोषणा केली.
यामध्ये शिक्षण सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे. यामध्ये सरासरी १० हजारांची वाढ करण्यात आल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. अमृतकाळातील असलेला हा पहिला अर्थसंकल्प असून यात शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास याचा समावेश असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करताना, प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक यांना ६ हजारवरुन १६ हजार रुपये, माध्यमिक शिक्षण सेवक यांना ८ हजारवरुन १८ हजार रुपये तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यांना ९ हजारवरुन २० हजार रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.
शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी १० हजार रुपयांची वाढ
☑️प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : ६ हजारवरुन १६हजार रुपये
☑️माध्यमिक शिक्षण सेवक : ८ हजारवरुन १८ हजार रुपये
☑️उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : ९ हजारवरुन २० हजार रुपये— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 9, 2023