31.4 C
New York
Tuesday, July 1, 2025

Buy now

spot_img

धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे कृषिमंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा अपघात झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नीची कार आणि ट्रॅव्हल बस यांच्यामध्ये भीषण धडक झाली असून पुणे-सोलापूर महामार्गावर आज १७ ऑक्टोबर रोजी पहाटे हा अपघात झाला आहे.

पहाटे ४.३० वाजता हा अपघात झाला असून धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या अपघातात किरकोळ जखमी झाल्या आहेत.

धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर  सोरतापवाडी या ठिकाणी राजश्री मुंडे यांच्या कार आणि ट्रॅव्हल बसमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये राजश्री मुंडे यांच्या कारने ट्रॅव्हल्सला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, धनंजय मुंडेंच्या कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले तर बसच्या पाठीमागील भागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या याबाबत अधिक तपास सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या बीडकडून मुंबईकडे जात होत्या, त्याचवेळी सोरतापवाडी या ठिकाणी एका खासगी ट्रॅव्हल्सला त्यांच्या काने धडक दिली. या अपघातामध्ये राजश्री मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर राजश्री मुंडे या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles