19.1 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

शरद पवारांनी मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या मराठवाड्यात उमेदवार निवडीसाठी मोठी रणनीती आखली; स्वतःच घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मागील काही महिन्यांपासून मराठवाडा हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. लोकसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगेपाटील आणि मराठा आरक्षणाचा मराठवाड्यावर मोठा प्रभाव असल्याचे पाहायला मिळाले. या प्रभावामुळेच महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटकाही बसला. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली असून महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मराठवाड्यात उमेदवार निवडीसाठी मोठी रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे.

 

विशेष म्हणजे, बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या उपस्थितीत पुण्यात शरद पवार स्वत: मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेताना दिसत आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराशी शरद पवार स्वत: चर्चा करत आहेत. शरद पवार यांच्या कार्यपद्धत पाहिली तर त्याच्यासाठी कुणी लहान किंवा मोठा नाही. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. त्या प्रत्येकाशी शरद पवार स्वत: भेटणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सर्वांचे ऐकूण घेतल्यानंतरच ते कुणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय घेतील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

 

 

आज बजरंग सोनावणे यांच्या मतदारसंघातील उमेदवारीसाठी मुलाखती घेतल्या. ज्या ज्या ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षांचे आमदार- खासदार आहेत, त्यांची मते विचारात घेऊनच निर्णय घेतले जाणार आहेत. पण ज्यांनी ज्यांनी इच्छुक म्हणून अर्ज केलाय त्यांचाही मानसन्मान होणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून आंदोलनाला सुरुवात केली. त्यावेळी आंतरवली सराटीत उपोषणस्थळी लाठीमार झाला, त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरले. लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्यांचे गंभीर परिणाम पाहायला मिळाले. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण मराठवाड्यात ठाकरे गट आणि काँग्रेसला मात्र मोठे यश मिळाले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles