0.4 C
New York
Sunday, January 12, 2025

Buy now

spot_img

पीडित चिमुरडीने साक्ष दिली आणि… बलात्कार करणार्‍या नराधमाला झाली 21 वर्षांची शिक्षा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पुणे |

तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणार्‍या नराधमाला पुणे येथील विशेष न्यायालयाने 21 वर्ष सक्तमुरी आणि 35 हजारांचा दंड ठोठावला. विशेष न्यायाधीश श्रीपदा पोंक्षे यांनी हा आदेश दिला. सागर अरूण चव्हाण (33, रा. भोसरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणात तीन वर्षाच्या पिडीत मुलीच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात दि. 11 एप्रिल 2015 रोजी फिर्याद दिली होती. खटल्यात विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी 9 साक्षीदार तपासले.

दि. 11 एप्रिल 2015 रोजी फिर्यादी यांची मुलगी खेळण्यासाठी बाहेर गेली असताना त्यावेळी त्या घरात काम करत होत्या. यावेळी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांची तीन वर्षाची मुलगी रडत घरी आली. तेव्हा तिला आईने रडण्याचे कारण विचारले असता तिने आरोपी सागर चव्हाण याने गैरकृत्य केल्याचे सांगितले. दरम्यान त्यांनी पतीला फोन करून या घृणास्पद प्रकाराबाबत कल्पना दिली.

त्यानंतर आरोपी ज्यांच्याकडे राहण्यास आला होता. त्यांनेच हा प्रकार केल्याने मुलीच्या आईने त्याच्या नातेवाईकांना याबाबत सांग्गितले. दरम्यान याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चव्हाणाल बेड्या ठोकल्या. खटल्यात विशेष सरकारी वकील लीना पाठक यांनी त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. खटल्यात पिडीत मुलीची साक्ष, मुलीच्या आईची साक्ष तसेच वैद्यकीय पुरावा महत्वाचा ठरला. न्यायालयाने या पुराव्यांच्या आधारे त्याला 21 वर्षाची शिक्षा सुनावली. गुन्ह्याचा तपास भोसरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक आर. टी. दरवडे यांनी केला.

न्यायालयाने आरोपीला जो 35 हजारांचा दंड ठोठावला त्यातील सर्व रक्कम पिडीत मुलीला नुकसान भरपाईच्या स्वरूपात देण्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles