13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
बीड ते ऑलिम्पिक असा प्रवास करणाऱ्या अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच्यासह अन्य ४७ जणांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. खेळाडूंसह त्यांना धडे देणाऱ्या प्रशिक्षकांनाही पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्र सरकारने गुरुवारी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. यंदाचा महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठित शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार दिग्गज बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना घोषित जाहीर झाला.

 

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक

पवन भोईर (जिम्नॅस्टिक्स), शुभांगी रोकडे (धनुर्विद्या), अनिल घाटे (कबड्डी), राजाराम घाग (दिव्यांग खेळाचे क्रीडामार्गदर्शक), दिनेश लाड (थेट पुरस्कार-क्रिकेट), सुमा शिरुर (थेट-पुरस्कार पॅराशूटिंग)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 

अविनाश साबळे, दीप रामभीया, आदित्य मेहता, संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, आदित्य मित्तल, प्रतिक पाटील, गिरीश काते, कुणाल कोठेकर, अक्षय तरळ, रुद्रांक्ष पाटील, शाहू माने, सुहृद सुर्वे, श्रेयस वैद्य, सर्वेश मेनन, सिद्धांत मोरे, रेनॉल्ड राफेल, निलम घोडके, शुशिकला आगाशे, कशीश भराड, जान्हवी जाधव, रुपाली गंगावणे, रुचिता विनेरकर, याश्वी शाह, दिया चितळे, श्रुती कडव, पूनम कैथवास, अक्षता ढेकळे, अपूर्वा पाटील, अंकिता जगताप, पंकज मोहिते, प्रियंका इंगळे, सुयश गरगटे, अक्षया शेडगे, धर्मेंद्रकुमार यादव, कोमल वाकळे, नंदिनी साळोखे, कल्याणी जोशी, विष्णू सर्वानन, वैष्णवी पाटील, श्रीधर निगडे, श्रेया नानकर, साहिल खान, नेहा देशमुख, जयेश मोरे, पूर्वा किनरे, नितिन पवळे.

शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार 
जयंत दुबळे, कस्तूरी सावेकर

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू )

अफ्रीद अत्तार, निलेश गायकवाड, अन्नपूर्णा कांबळे, अनिता चव्हाण, लताताई उमरेकर, प्रियेषा देशमुख, नताशा जोशी, प्रांजली धुमाळ.

अविनाश साबळेचा झंझावात
धावपटू अविनाश साबळे १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर इंडियन आर्मीमध्ये दाखल झाला. लष्करासाठी अविनाशने सियाचीनच्या बर्फाळ हिमनदीपासून ते राजस्थानच्या वालुकामय भागापर्यंत देशाची सेवा केली. आर्मीमध्ये असताना २०१५ मध्ये त्याने ॲथलीट होण्याचा निर्णय घेतला. १३ सप्टेंबर १९९४ रोजी महाराष्ट्रातीलबीड जिल्ह्यातील मांडवा गावात जन्मलेला हा तरुण आता देशाची शान बनला आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या अविनाशला लहानपणी शाळेत जाण्यासाठी ६ किलोमीटर चालत जावे लागे, त्यामुळे तो धावतच जायचा आणि तेथूनच त्याच्यात रेसिंगची आवड कायम राहिली. २०१७ मध्ये आर्मीचे प्रशिक्षक अमरीश कुमार यांनी अविनाशला स्टीपल चेसमध्ये धावण्यास सांगितले आणि त्यानंतर अविनाशने मागे वळून पाहिले नाही.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles