18.2 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

3 कोटी लोक आपल्या योजनांची लाभार्थी, सरकार आपलेच येणार फक्त ओव्हर कॉन्फिडन्स नको : देवेंद्र फडणवीस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विधानसभा जिंकण्यासाठी आपले सर्व विरोधक एकत्रित आले आहेत. ते कुठलेही तडजोड करायला तयार आहेत. परंतु सरकारने केलेल्या कामामुळे लोक आपल्यासोबत आहेत. आपण आणलेल्या सरकारी योजनांचे ३ कोटींहून अधिक लाभार्थी आहेत. त्यांची मते जरी आपल्याला मिळाली तरी आपलेच सरकार पुन्हा येईल. फक्त ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.

 

विधानसभा निवडणूक लागायला अगदी काहीच दिवस शिल्लक राहिलेले असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी संवाद साधून त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्यात जोश भरला. तत्पूर्वी फडणवीस यांनी केलेल्या भाषणात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महत्त्वपूर्ण सल्लेही दिले.

 

उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला, म्हणून रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत!

 

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले. “उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे. मराठी व हिंदू मते सोबत नसल्याने त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत. आपलेच सरकार येईल, अशी राज्यात परिस्थिती आहे. पण अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका. जमिनीवर राहून काम करा”, असा कानमंत्र फडणवीस यांनी दिला.

 

देशात जिकडे जातोय तिकडे लोक एकच विचारतात, यावेळी महाराष्ट्रात काय होईल?

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे महत्त्व देशाच्या राजकारणात किती आहे, हे कार्यकर्त्यांसमोर विषद केले. ते म्हणाले, मी देशभरात फिरतोय. हरियाणामध्ये काय होईल हे मला विचारत नाहीत. पण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काय होईल, हे मला प्रत्येकजण विचारतोय. राज्यात आपलेच सरकार येईल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.

 

प्रत्येक बुथवर किमान 20 लोकांना भाजपचे सदस्य करा

 

आपल्या विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवा. प्रत्येक बुथवर किमान 20 लोकांना भाजपचे सदस्य करा. सदस्य करताना त्यांच्याकडे मते मागू नका. सदस्य झाल्यावर त्याला आपसुकच मतदानाचे महत्त्व कळेल, असेही अमित शाह म्हणाले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles