20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

आष्टी विधानसभा मतदारसंघातील नेत्यांची मग्रुरी आपल्याला उतरवायची आहे- खा. बजरंग सोनवणे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

ज्या नेत्यांनी पवार साहेबांना धोका दिला त्यांना जनतेने नाकारले

 

आष्टी | प्रतिनिधी.

 

लोकसभा निवडणुकीत सर्व सामान्य जनतेने निवडणूक हातात घेऊन मला निवडून दिले आहे. या झालेल्या लोकसभा निवडणुकीत आष्टीतील आजी माजी आमदाराचा पराभव केलेला आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातील नेत्यांची मग्रुरी आपल्याला उतरवायची आहे. बीड जिल्ह्यातील ज्या नेत्यांनी पवार साहेबांना धोका दिला त्यांना जनतेने नाकारले आहे. दोन महिन्यानंतर राज्याच्या राजकारणातील चित्र बदलणार असल्याचे सांगून बीड जिल्ह्यातील सहाच्या सहा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येणार आहेत. त्यामुळे एकजुटीने कामाला लागा. आष्टी विधानसभा मतदारसंघात राज्यांचे लक्ष वेधले आहे. शरद पवार यांना मानणारां एक वर्ग आहे. त्यामुळं यावेळी आष्टी मतदार संघात आमदार होणार. सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मतदान केले आहे. शरद पवार साहेब आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आशीर्वादाने मी खासदार झालो. मतदारांना कुणी वेठीस धरू नये असा इशारा राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आष्टी येथे बोलताना दिला.

 

 

आष्टी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशचे उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रमुख ॲड.नरसिंह लक्ष्मणराव जाधव यांनी विधी सेल च्या प्रदेश कार्यालय व वकील व्यवसायाच्या कार्यालयाचे उद्घाटन बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजीत कार्यक्रमात खा. बजरंग सोनवणे बोलत होते.

 

 

पुढे बोलताना खा. बजरंग सोनवणे म्हणाले की, आष्टी मतदार संघातील जनतेने लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मताची लीड जरी नसली दिली तरी गेल्या लोकसभेच्या मानाने जवळजवळ चाळीस हजार मतदान कमी केले व सामान्य जनतेने या ठिकाणी प्रस्थापित युतीचे तीन आमदार असताना देखील येथे सामान्य मतदार व सामान्य कार्यकर्त्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाबरोबर उभे राहून ताकद निर्माण केली त्याबद्दल आष्टी मतदार संघातील जनतेचे आभार मानले बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रश्न तसेच बीड जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या संबंधित जे जे प्रश्न असतील ते प्रश्न देखील सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत असे त्यांनी नमूद केले तसेच या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फक्त एकच आमदार असून बाकी जिल्हा परिषद पंचायत समिती यांची पदे नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेच्या खासदार म्हणून माझ्याकडे कामाच्या खूप अपेक्षा आहेत व त्या अपेक्षा सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केले पक्षामधून जे लोक घड्याळाचे नावावर निवडून आले व ज्यांनी शरदचंद्र पवार साहेब यांना धोका दिला अशा मंडळीला विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे थारा असणार नाही उलट पक्षी या लोकांच्या गुंडगिरी,दादागिरी व दहशतीचा राजकारणाला या मतदारसंघातील जनता कंटाळली असून सदरील मायबाप जनता येत्या विधानसभेला त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले.

 

ॲड.नरसिंह लक्ष्मणराव जाधव यांनी त्यांची भूमिका मांडताना म्हणाले की, आष्टी मतदार संघामध्ये पायाभूत सुविधा नसून या मतदारसंघांमध्ये कुठलाही कारखाना नाही. कडा येथिल कारखाना महेश सहकारी साखर कारखाना होता तो देखील बंद पडलेला असून त्या ठिकाणी कामगारांची पैसे देखील कारखाना परत करू शकलेला नाही आष्टी मतदार संघात आजपर्यंत एमआयडीसी देखील प्रस्थापित नेत्यांनी आणलेली नाही तसेच पिण्याच्या पाण्याचा साधा प्रश्न देखील सोडू शकले नाही, रस्ते रोड पाणी , दर्जेदार काम न होता विशिष्ट लोकांच्या घरामध्ये हा पैसा गेला असून मतदारसंघांमध्ये ठराविक कार्यकर्ते यांच्याकडे प्रचंड पैसा जमा झालेला असून त्या जोरावर आष्टी मतदार संघात दहशतीचे राजकारण चालू आहे आष्टी मतदार संघामध्ये अनेक घोटाळे उदाहरणार्थ पाटोदा नगरपंचायत मधील बंधारा या प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा नोंदला झालेला असून बीड जिल्ह्यातील मंदिर मज्जित जमिनी घोटाळ्यामध्ये देखील उच्च न्यायालयामध्ये फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत एवढेच नाही तर शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये विहिरी नगरपंचायत ग्रामपंचायत मध्ये घरकुल वाटप यामध्ये देखील प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार असून शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात शेतकऱ्यांचे छोटे छोटे काम कुठेही पैसे दिल्याशिवाय होत नाहीत त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्येचा प्रमाण वाढलेला आहे बीड जिल्ह्यातील अनेक बँका बंद पडलेले आहेत लोकप्रतिनिधी यांची निष्क्रियता यामुळे लोकशाही धोक्यात असून सामान्य माणसाला हे प्रस्थापित लोक त्रासदायक आहेत. या मतदारसंघांमध्ये शरदचंद्र पवार साहेब यांनी निवडणूक लढण्याची संधी दिली तर नव्या चेहऱ्याला उमेदवारी मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात पक्षाने जो उमेदवार दिला जाईल जो नवा चेहरा दिला जाईल त्याला निवडून आणण्याचे काम आम्ही एक दिलाने करू असे ॲड. जाधव यांनी सांगितले.

 

 

कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे, प्रदेशाउपध्यक्ष बाळासाहेब मिसाळ, डॉ. विलास सोनवणे, प्रदेश सरचिटणीस प्रा. सुशिलाताई मोराळे, आष्टी तालुका अध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जुबेर चाऊस ,माजी पंचायत समिती सदस्य गुलाबराव घुमरे, किशोर हंबर्डे, अमोल तरटे, कॉ. महादेव नागरगोजे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य ॲड. सय्यद वहाब, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष डॉ. नदीम शेख, जिल्हा सरचिटणीस गणीभाई, अतुल शिंदे, शिवाजी पारखे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव साके, दादासाहेब झांजे, गंगा आबा आजबे, जिल्हाध्यक्ष लीगल सेल सतीश गाडे, मुखराम पठाण, ॲड. ज्ञानेश्वर नाईकनवरे आदीसह महविकास आघाडीचे आजी माजी पदधिकारी उपस्थीत होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.वहाब सय्यद यांनी केले, प्रास्ताविक पक्षाचे पाटोदा तालुका अध्यक्ष शिवभूषण जाधव यांनी केले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles