13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चुंबळी फाट्यावर रस्ता रोको 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पाटोदा । प्रतिनिधी

 

सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या खरीप पिकाचे नुकसान झाले त्यामुळे बीड जिल्हयात ओला दुष्काळ जाहिर करुन प्रति हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्या यासह शेतकर्‍यांच्या इतर मागण्यासाठी गुरुवारी चुंबळी फाट्यावर सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 

पावसामुळे शेतकर्‍यांच्या खरीप पिकाचे नुकसान झाले त्यामुळे बीड जिल्हयात ओला दुष्काळ जाहिर करुन प्रति हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्या., 2023 सालचा खरीप पिकाचा कोणत्या पिकाला किती टक्के विमा मंजुर केला तो अद्याप विमा कंपनीकडुन शेतकर्‍याला मिळाला नाही तो तात्काळ द्या., सोयाबीनला 7000 रुपये आणि कापसाला किमान 9000 रुपये हमी भाव देऊन खरेदी केंद्रे तात्काळ चालु करुन 24 तासाच्या आत शेतकर्‍यांना पैसे देण्याची शासनाकडुन तरतुद करा., गाईच्या 3.5 फॅट च्या दुधालाा 45 रुपये व म्हशीच्या 6.0 फॅट च्या दुधाला 65 रुपये हमी भाव द्या., गेल्यावर्षीच्या पावसाच्या तुटीमुळे 80 ते 90 टक्के पिके उध्वस्त झाली त्या मुळे खरीप पिकात घट झाली म्हणून बँकांचे पिक कर्ज थकीत राहिले त्या मुळे बँकेने शेतकर्‍यांची खाती होल्ड केली त्या मुळे शेतकरी जास्तच आर्थिक संकटात आला. शासनाच्या कित्येक योजनेच्या लाभापासुन तो दुर राहात आहे त्या साठी शासनाने बँकेला होल्ड काढण्याचे तात्काळ आदेश द्यावेत. यासाठी किसान सभेच्या वतीने चुंबळी फाटा येथे रस्ता आंदोलन करण्यात आले. यावेळी उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला. यावेळी शेकडो शेतकरी आपल्या बैलगाडी सोबत सहभागी झाले होते.

 

शेतकर्‍यांच्या मागणीसाठी किसान सभेचे का.महादेव नागरगोजे, शेकापाचे जिल्हा चिटणीस विष्णुपंत घोलप, चक्रपाणी जाधव,राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष राहुल शहुराव जाधव, आष्टी तालुकाध्यक्ष रविदादा ढोबळे,शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष मुकुंद शिंदे,समाज सेवक सय्यद अश्रफ भाई कारेगावकर, का.नांगरे, का.पाखरे,सह हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles