15.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

‘ज्ञानराधा’साठी लिक्विडेटर नेमण्याचे निर्दश; केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पुणे |

ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात अनेक छोट्या गुंतवणूकदारांच्या आणि शेतकरी सभासदांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेतली असून या विषयासंदर्भात लिक्विडेटर नेमण्याचे निर्देश केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत.

 

‘ज्ञानराधा’मुळे शेतकरी, कामगार, कष्टकरी, छोटे व्यापारी असे ग्रामीण भागातील गुंतवणूकदार अडचणीत आहेत. याबाबत तक्रारींची संख्या मोठी असल्याने यावर तातडीच्या बैठका घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या बैठकीस आमदार नारायण कुचे, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह केंद्रीय सहकार मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.

https://x.com/mohol_murlidhar/status/1836734055284391981?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1836734055284391981%7Ctwgr%5E06873f39903a3bf72820a2cd969d23d853b3de79%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Flokankshanews.in%2Fnews%2F11571%2F

MSCS कायदा 2002 च्या कलम 86 अंतर्गत सोसायटी बंद करण्याची नोटीस सदर सोसायटीला 15 दिवसांच्या आत आक्षेप असल्यास सादर करण्यासाठी देण्यात येत आहे. अधिनियमाच्या कलम 89 अंतर्गत या प्रकरणात एका लिक्विडेटरची नियुक्ती अधिनियमाच्या नियम 28 आणि 29 नुसार सोसायटीच्या दायित्वांचे वितरण करण्यासाठी केली जाईल. असे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles