13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

मैत्रीपूर्ण लढतींची शक्यता अधिक; बीड जिल्ह्यातील या मतदारसंघात महायुतीतच लढत?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात प्रथमच तीन पक्ष एकत्र निवडणूक लढत असल्यामुळे इच्छूकांची संख्या वाढली आहे. महायुतीमुध्ये विद्यमान आमदार ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाला ती जागा सोडण्याचे प्राथमिकरित्या मान्य करण्यात आल्याचे मानले जात आहे. त्यामुळे 2019 मध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत ज्या ज्या ठिकाणी झाली तिथे दोन्ही पक्षांचे उमेदवार माघार घेण्यास तयार नाहीत, अशी स्थिती आहे. अशा वेळेस महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे.

बीड जिल्ह्यातील ६ मतदारसंघापैकी ३ मतदारसंघ असे आहेत जिथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे इच्छूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोणीही माघार घ्यायला तयार नाही, आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने या जागेसाठी अजित पवार आग्रही आहेत. तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी मंत्री सुरेश धस हेही इच्छुक असून धस, धोंडे यांनी आपण या निवडणुकीत उमेदवार असणारच असेही जाहीर केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी झाल्यास महायुतीला फटका बसणार आहे.

तर दुसरीकडे गेवराई मतदार संघात विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे भाजपचे आहेत. या जागेवरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला असून या ठिकाणी विजयसिंह पंडित हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. २०१९ च्या पंडित हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यामुळे या ठिकाणीही महायुतीत बंडखोरी होणार आहे.

तसेच माजलगाव मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश सोळुंके आहेत. त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली असून वारसदार म्हणून आपले पुतणे जयसिंह सोळुंके यांचे नाव जाहिर केले आहे. ते यावेळी निवडणूक लढविणार आहेत. असे असले तरी भाजपचे २०१९ च्या निवडणूकीत उमेदवार रमेश आडसकर हेही या मतदार संघात इच्छुक असून उमेदवारी न मिळाल्यास ते बंडखोरी करू शकतात. अशी एकंदर परिस्थिती असल्याने बीड जिल्ह्यातील तीन जागेवर महायुतीला मैत्रीपूर्ण लढती कराव्या लागणार आहेत.त्यामुळेच राज्यातील किमान २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींची शक्यता वर्तवली जात आहे.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मैत्रीपूर्ण लढत असं काही नसंत म्हणत ही शक्यता नाकारली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत दिले आहे. ते म्हणाले, उमेदवारी नाही मिळाली तर कार्यकर्ते हे दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात.

 

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles