नाशिक |
प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
2017 साली दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी महापालिकेत आंदोलन केले होते. दिव्यांगांच्या विविध समस्या घेऊन बच्चू कडू आयुक्तांच्या दालनात गेले होते. त्यावेळी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा व बच्चू कडू यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यावेळी ते आयुक्तांवर धावून गेल्याचा त्यांनी आयुक्तांवर हात उगारल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यानंतर बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिकच्या जिल्हा न्यायालयात ही केस सुरु होती. दमदाटी करणे व सरकारी कामात अडथळा अशा दोन प्रकरणात त्यांना दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा करण्यात आली आहे.