18.2 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

आरक्षणाचा फेक नरेटिव्ह चालणार नाही, मराठा अंगावर घालता; पंकजा मुंडे शरद पवारांवर भडकल्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आता आरक्षणाच्या बाबतीतील फेक नेरेटीव्ह चालणार नाही, आता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे. तुम्ही आमच्या पक्षावर बोलताय, मग तुमची भूमिका काय, असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला सवाल केला आहे.

पुण्यातील मेळाव्यातून कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षावर टीका केली.

 

पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना आवाहन 

 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीतील सर्वच पक्षाला जोरदार फटका बसला आहे. विधानसभेत तो फटका बसू नये यासाठी भाजपकडून खबरदारी घेतली जात आहे. मराठा समाजाला आरक्षण भाजपनेच दिले. परंतु तरीही मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरुन लोकसभेला आपल्याला नाकारलं, कारण विरोधकांनी फेक नेरेटीव्ह पसरवला, असा दावा भाजप नेत्याकडून केला जात आहे. त्यानंतर आता प्रथमच पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रश्न विचारण्याचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन केले. तसेच शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला.

 

आता फेक नरेटिव्ह चालणार नाही 

 

पंकजा मुंडे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन फेक नेरेटिव्ह पसरवणाऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही सवाल विचारा. तुमची भूमिका काय, असा प्रश्न त्यांनाही विचारा. नाहीतर बाप दाखव अन्यथा श्राद्ध कर, हा सूर्य हा जयद्रथ. खोटा प्रचार करणाऱ्यांना उघड पाडलेच गेले पाहिजे, असेही पंकजा म्हणाल्या.

 

ओबीसी, मराठा आमच्या अंगावर घालताय

 

पंकजा मुंडे म्हणाल्या की, भाजप कार्यकर्त्यांनी आता शांत बसून चालणार नाही. आपल्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादीला विचारा, तुमचं म्हणणं आहे का मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे. सगळंच तुम्ही आमच्यावर घालताय, आमच्याच अंगावर ओबीसी समाज घालताय, मराठा समाज आमच्या अंगावर घालताय, आमच्याच अंगावर दलित बांधवांना घालताय, जणू काही आपण दुसऱ्या देशातून आलोय आणि येथील राजकारण उध्वस्त करायला लागलो आहे, असे म्हणत मुंडे यांनी पवारांच्या राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल चढवला.

 

तुम्हीच पक्षाचे खरे सैनिक आहात

 

लोकसभेला आपलं जे नुकसान झालंय ते भरुन काढायचं आहे. म्हणूनच, आपल्यासारख्या छोट्या छोट्या योद्ध्यांना पक्षाने मैदानात उतरवलं आहे. आता, पक्षासाठी आपण सर्वांनी जोमाने काम करायला हवं, सेनापती सांगत असतो पण सैनिकाला प्रत्यक्ष लढावं लागतं, तुम्ही सैनिक आहात. भाजप कार्यकर्त्यांना आपापसातील मतभेद विसरुन पक्षासाठी काम करावे, असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles