19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अ‍ॅड. नरसिंह जाधव यांना खा.सुप्रिया सुळे, आ.रोहित पवार यांच्याकडून निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सुचना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी विधानसभा मतदारसंघातून निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच येत्या निवडणुकीत उमेदवारीची संधी देणार 

 

पाटोदा । प्रतिनिधी

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधी सेलचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष अ‍ॅङ. नरसिंह जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुप्रियाताई सुळे आणि युवा नेते आमदार रोहितदादा पवार यांची नुकतीच कर्जत मतदारसंघात जाऊन भेट घेतली. यावेळी जाधव यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे आपण आष्टी विधानसभा मतदारसंघातून  निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून, पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना येत्या निवडणुकीत उमेदवारीची संधी द्यावी अशी मागणी केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीत पक्षातील निष्ठावंतांनाच उमेदवारीची संधी देण्यात येणार असून अडचणीच्या काळात पक्षसोबत राहणारे कार्यकर्तेच खरे निष्ठावंत आहेत. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागावे पक्ष योग्य तो निर्णय घेऊन पात्र उमेदवाराला संधी देईल आणि पक्ष देईल त्याच उमेदवाराचे सर्वांनी निष्ठेने काम करावे अशा सूचनाही यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी केल्या.

अ‍ॅड. नरसिंह जाधव हे शरद पवारांचे कट्टर समर्थक असणारे स्वर्गीय अ‍ॅड. लक्ष्मणराव जाधव यांचे सुपुत्र सुपुत्र आहेत. अ‍ॅड. जाधव हे शरद पवारांचे कट्टर समर्थक होते त्यांनी पंचायत समिती सभापती पद तसेच पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत काम केलेले होते. त्यांनी कायम शरद पवारांना साथ देण्याचे काम केले. त्याच्यानंतर आता त्यांचे पुत्र अडवोकेट नरसिंह जाधव आणि राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिवभूषण जाधव हे शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहे.

आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाटोदा तालुक्यातील रहिवासी व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधी सेलचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष अ‍ॅङ.नरसिंह जाधव हे आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून, अ‍ॅङ.नरसिंह जाधव यांनी आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील गावांचा दौरा केला असून या भागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण निवडणूक लढविनार असल्याचे सांगून आपली भूमिका नागरिकांना स्पष्ट करीत आहे .

अ‍ॅङ. जाधव यांचे स्वच्छ चरित्र आणि नवा चेहरा म्हणून मतदार संघातील गावागावातील नागरिकाकडून स्वागत होत असून आपण ही निवडणूक लढवावीच अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.  आता मतदारसंघात परिवर्तन करण्याची गरज असून,  नव्या नेतृत्वाला संधी द्यावी अशी अपेक्षा नागरिक बोलून दाखवित आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles