मुंबई |
शिंदे-फडणवीस सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (27 फेब्रुवारी) सोमवारपासून सुरु झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा आहे. दरम्यान, विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात व्हीपवरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी पाहयला मिळाली, कांद्या प्रश्नी आक्रमक झाले. तर विरोधकांनी शेतकऱ्यांची वीज तोडणी, घरगुती गॅस दरवाढ तसेच महागाईच्या विरोधात विधान भवनाच्या पाऱ्यावर आंदोलन करत, सरकारचा निषेध केला. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ‘विधिमंडळ चोर आहे’, या वक्तव्यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली असून, यावरुन गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. आज अधिवेशनाचा दुसरा आठवडा असून, विविध मुद्दावर विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत.
विरोधकांच्या आंदोलन करत घोषणाबाजी.
शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत.अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे. जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही.बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे. मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी. नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विरोधक आक्रमक.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सहावा दिवस असून, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडी आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, असं विरोधकांनी मागणी केलीय.