21.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

विधानसभेचा बिगुल वाजला..! महाविकास आघाडीचा १६ तर महायुतीचा २० तारखेला प्रचाराचा नारळ फोडणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारची मुदत संपत आल्यानं ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणुक होऊ घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महायुती तसेच महाविकास आघाडीने आपली तयारी सुरू करून दिली आहे.

 

मेळावे, जाहीर सभा, बैठकांमधून राज्यातील २८८ मतदारसंघात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच आता महाविकास आघाडी येत्या १६ तारखेला तर महायुती २० ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील एकूण ०७ विभागात व २८८ मतदारसंघात एकाच दिवशी विभागनिहाय महायुतीतील सर्व घटक पक्ष संवाद, लाभार्थी यात्रा व सभा आयोजित करणार आहे. तसेच विभागवार ०७ विभागात मुख्यमंत्र्यांच्या तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहे. या कार्यक्रमाची सुरूवात कोल्हापुर येथे २० ऑगस्ट रोजी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन होणार आहे.

 

तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची १६ ऑगस्ट रोजी एकत्रित सभा होणार आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. या सभेला महाविकास आघाडीतील शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सभा होणार असून इतरही सर्वच नेते उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles