साेलापूर |
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच माढा तालुक्यातील एका गावात छगन भुजबळ यांच्यासाेबत आले हाेते. या मतदारसंघातील उमेदवार पाडा. फडणवीस ज्या मतदारसंघात भुजबळांना घेऊन फिरतील त्या मतदारसंघातील उमेदवारही पाडा, असं आवाहन मराठा आरक्षण आंदाेलनाचे नेते मनाेज जरांगे-पाटील यांनी बुधवारी साेलापुरातून केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांची राज्यात शांतता रॅली सुरू आहे. ही रॅली बुधवारी साेलापुरात पाेहाेचली. छत्रपती शिवाजी महाराज चाैकात झालेल्या जाहीर सभेत जरांगे-पाटील समाज बांधवांना संबाेधित केले.
जरांगे-पाटील म्हणाले, फडणवीस यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. धनगरांना द्यायचे नाही. या लाेकांनी मला घेरायला सुरुवात केली आहे. काही लाेकांना माझ्या अंगावर साेडले जातंय, असे म्हणत त्यांनी भाजप नेते नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली. मराठवाड्यात येऊन दाखवा असे मी कधीच म्हणालाे नाही. तू माझ्या नादी लागू नकाे. मी तुला दादा म्हणताेय. आम्ही तुमचा सन्मान करताेय. पण बिघडलाे तर अवघड हाेईल, असा इशाराही त्यांनी दिला.