3.6 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

नंदकुमार ठाकूर यांची बदली; अविनाश बारगळ बीडचे नवे पोलीस अधिक्षक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या जागी अविनाश बारगळ अमरावतीवरून येतं आहेत. बारगळ यांची अमरवतीतील कारकीर्द राज्यात चर्चेत राहणारी ठरलेली होती. नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असली तरी त्यांना नवीन ठिकाणी अजून नियुक्ती मिळालेली नाही. 

बीडमध्ये नंदकुमार ठाकूर यांनी दोन वर्ष सेवा बजावल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अविनाश बारगळ बीडला येतं आहेत. बारगळ यांनी अमरवतीमध्ये चार वेळा पोलीस विभागात सेवा बजावली आहे.

अतिरिक्त पोलिस अधिक्षक त्यानंतर पोलिस उपायुक्त म्हणून अमरावती शहरात त्यांनी कार्यकाळ उपभोगल्यानंतर अमरावती पोलीस अधिक्षक आणि नंतर पुन्हा अमरावतीमध्येच सीआयडीचे अधीक्षक म्हणून गृहविभागाने त्यांना काम करण्याची संधी दिली होती. एकाच शहरात चार वेळा पोलीस दलात वेगवेगळ्या पदावर काम करणारे अधिकारी म्हणून बारगळ यांची राज्यात मोठी चर्चा झाली होती. आता ते अमरावतीच्या सीआयडी विभागातून बीडला पोलीस अधिक्षक म्हणून येतं आहेत. एक चांगला आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles