16.8 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

महायुतीच्या जागा वाटपाचा फटका आष्टीचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबेना बसणार?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सिटिंग आमदार असला तरी ज्याच्याकडे तुल्यबळ उमेदवार असेल तर ती जागा दुसऱ्या पक्षाने लढवायची ; अजितदादांनी स्पष्टच सांगून टाकले 

 

बीड |
अजित पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीची जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झाल्याचं सांगितलं. साधारणपणे सिटींग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. पण त्यात काही जागांची अदलाबदल होणार आहे. आता एखादा सिटिंग आमदार असेल. पण त्याच्या तुलनेत दुसऱ्या पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार असेल तर ती जागा दुसऱ्या पक्षाने लढवायची, असं आमचं ठरलं आहे. पण ज्या उमेदवाराला ही जागा दिली जाणार आहे, तो तुल्यबळ असावा. त्याची निवडून येण्याची क्षमता असावी हे आम्ही पाहणार आहोत. याबाबतच आमच्या तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. म्हणजे या निवडणुकीत महायुतीत सिटिंग उमेदवारांची जागा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना टेन्शन येणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान या निर्णयाचा  पहिला फटका आष्टी विधानसभा मतदार संघाचे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना बसणार असल्याचे महायुतीच्या जागा वाटपाच्या तडजोडीवरुन दिसून येऊ लागले आहे.
लोकसभेच्या निवडणुक प्रचारा दरम्यान भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जामखेड येथील प्रचार सभेत सुरेश धस हेच आष्टी मतदार संघाचे उमेदवार असतील अशी घोषणा केली होती. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीची जागा भाजपच्या कोठ्यात जाणार हे आता स्पश्ट झाले आहे. तसेच या मतदार संघात भाजपकडून विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी सुरेश धस यांच्यासह माजी आमदार भीमराव धोंडे हेही इच्छुक असल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी धस धोंडे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. विशेष म्हणजे भाजपचें दोन्ही उमेदवार तुल्यबळ आणि आपली व्होट बँक असणारे आहेत.
विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. या निवडणुकीची महायुती आणि महाविकास आघाडीसह राज्यातील इतर पक्षांनी जोरदार तयार केली आहे. महायुतीने तर सीट शेअरिंगबाबत प्राथमिक बोलणीही केली आहे. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच कोणत्या जागांवर अदलाबदली होणार आहे, याची माहितीही अजितदादांनी दिल्याने महायुतीतील आमदारांची चांगलीच डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवीन चेहऱ्यांना संधी देणार

अजितदादा यांनी आम्हीही तरुणांना संधी देणार असल्याचं स्पष्ट केलं. आमच्या पक्षात अनेक तरुण आहेत. कितीतरी तरुणांची नावे मी सांगू शकतो. आता आम्ही निर्णय घेताना काही सिटिंग आणि नव्या जागांच्या ठिकाणी नवे चेहरे देणार आहोत. मीही युवाशक्तीला संधी देण्याचं काम करत आहे. मी तरुणपणी खासदार झालो, तेव्हापासून आतापर्यंत मी तरुणांना संधी देत आलो आहे. आताही तुम्ही पाहिलं असेल आम्हाला ज्या जागा मिळाल्या त्यात आम्ही अनिल भाईदास पाटील आणि आदिती तटकरे आदी नवे चेहरे दिले. आम्ही सर्व समाजाला संधी देत आहोत, असं अजितदादांनी स्पष्ट केलं.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles