15.9 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अडीच लाखाची लाच मागितल्याप्रकरणी सायबर ठाण्यातील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

गोठवण्यात आलेले बँकेचे खाते पूर्ववत करण्यासाठी बीड सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने अडीच लाखाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारने बीड एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सदरील कर्मचाऱ्यास अडीच लाखाची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष मुरलीधर वडमारे (पोलीस हवालदार, ब.न.1495 नेमणूक सायबर पोलीस ठाणे बीड (वर्ग -3) रा.जुना धानोरा रोड बीड) असे लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांचा एक्साईड बॅटरी व इनव्हरटर विक्री चा व्यवसाय आहे .सायबर पोलीस ठाणे, बीड सायबर गु.र.न.66/ 2024 मधील आरोपी यास तक्रारदारांने ईनव्हरटर व बॅटरी विकल्या होत्या त्याचे बील आरोपीने त्याचे बॅंक खात्यातुन तक्रारदार यांना अदा केले होते. कोणतीही खात्री न करता तक्रारदार यांचे पंजाब नॅशनल बँक, बीड येथील कॅश क्रेडिट खाते हे पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे बीड यांच्याकडून गोठवण्यात आले होते. सदरील गोठवण्यात आलेले बॅंक खाते पुर्ववत करण्यासाठी तक्रारदार यांना लोकसेवक वडमारे यांनी पंचासमक्ष 3 लाख 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडंती 2 लाख 50 हजार स्वीकारण्याचे मान्य करुण लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला. वाडमारे फरार असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस अंमलदार, सुरेश सांगळे, श्रीराम गीराम, भरत गारदे, अविनाश गवळी, अंबादास पुरी, निकाळजे, गणेश मेहेत्रे यांनी केली.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles