13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

विधानसभा निवडणूक काहीच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकपक्ष कंबरकासून कमला लागला आहे. याचेच औचित्य साधून राज्यसरकारने एक मोठी घोषणा केली आहे.

याआधी अर्थसंकल्पात सरकारने अनेक योजनांनी महिला, तरुण आणि लाडक्या भावांना आकर्षित केले होते. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कर्जमाफी करण्याची मोठी घोषणा राज्यसरकारने केली आहे. राज्याच्या आर्थिक बाबीमध्ये राज्याचा GDP हा आधीच रसातळाला गेला आहे. आर्थिक बाबींमध्ये देश आधीच कर्जत बुडाला आहे. ठराविक राज्य हे एका ठराविक पर्सेन्टेज पर्यंत कर्ज घेऊ शकतो. परंतु हा कर्जबाजारी पण अर्थव्यवस्थेसाठी घटक असतो. अश्यातच आता शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवर नवी घोषणा झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

 

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याचे बोललं जात आहे. जवळपास ९३८ आदिवासी सोसाट्यांमध्ये शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेतंर्गत महिलांना १५०० दर महिना दिले जाणार आहे. त्यासोबतच तरुणांसाठी लाडका भाऊ ही योजना सुरु केली आहे. त्याद्वारे बारावी पास तरुणांना दरमहा ६ हजार रुपये, आयटीआय आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना १० हजार रुपये मिळणार आहे.

 

त्यानंतर आता राज्य सरकार शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी एक मोठी घोषणा करणार आहे. यानुसार लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. जवळपास ९३८ आदिवासी सोसाट्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

 

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीबद्दल एक विधान केले होते. “कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे. केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा टाकून 3 लाख रुपयांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का, याची माहिती सरकार गोळा करू लागलं आहे. सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते.त्यामुळे आता राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीबद्दल कधी घोषणा करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles