19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

शरद पवारांनी बंडखोरांच्या विरोधात दंड थोपटले; परळी, आष्टी आणि गेवराई विधानसभा मतदारसंघातून नवीन चेहऱ्यांना संधी देणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई पाहायला मिळाली. तशीच पुनरावृत्ती आता विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. कारण, शरद पवार यांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मैदानात उडी घेतली आहे. ज्या आमदारांनी बंडखोरी केली, त्यांना धडा शिकवण्यासाठी व त्यांच्या विरोधात युवकांना संधी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यामध्ये बारामती,हडपसर ,वडगाव शेरी,मावळ, बीड जिल्ह्यातील आष्टी, परळी आणि गेवराई सह राज्यातील 20 विधानसभा मतदारसंघातून नवीन  चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शरद पवारांनी दंड थोपटले असून प्रमुख 20 विधानसभा मतदारसंघात तरुणांना मैदानात उतरवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामध्ये, धनंजय मुंडेंच्या परळी, हसन मुश्रीफ यांच्या कागल, दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तर, आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघातूनही नवयुवकांना संधी देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील 20 मतदारसंघात चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादीकडून यापूर्वी तासगाव विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील तर, अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यानंतर, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 40 पेक्षा जास्त आमदारांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत महायुतीत सहभाग घेतला. मात्र, शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या हिंमतीने अजित पवारांविरुद्ध लढा दिला. लोकसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ 1 खासदार निवडून आला. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तब्बल 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला. त्यामध्ये, बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे, आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवयुवकांना संधी देण्याची रणनीती आखली जात आहे.

 

शरद पवार यांना उतारवयात आधार हवा असताना दगा दिल्याने आता या वयातही त्यांनी दगबाजांना योग्य जागा दाखविण्यासाठी मैदानात उडी घेतल्याने त्यांच्या लढतीबाबत उत्सुकता वाढत राहणार आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles