11.7 C
New York
Tuesday, October 8, 2024

Buy now

spot_img

सुतार समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आळंदी येथे होणार

- Advertisement -

लातूर येथे अधिवेशन तयारी पूर्व झालेल्या बैठकीत निर्णय 

लातूर |
दि. 5 मार्च रोजी विश्वकर्मा गार्डन फंक्शन हॉल लातूर येथे महाराष्ट्र राज्य सुतार समाजाची बैठक होऊन, या बैठकीत समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ना नेता ना संघटना, ना व्यक्ती ना समिती, फक्त समाज या सूत्रानुसार अधिवेशनाची तयारी करण्यासाठी राज्यभर जिल्हा, तालुका पातळीवर बैठका घेऊन अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे आद्य संत भोजलिंग काका महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांची समाधी आळंदी येथे आहे. सदरील अधिवेशन आळंदी येथे घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य  मुरलीधर पांचाळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गणपतराव गायकवाड अण्णा होते. प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीस सरुवात झाली.
यावेळी राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्याबाबतचे प्रास्ताविक व संकल्पना सतीश शिंदे ( चिखली जि. बुलढाणा) यांनी मांडताना हे अधिवेशन ना नेता ना संघटना, ना व्यक्ती ना समिती, फक्त समाज या सूत्रानुसार अधिवेशनाची तयारी करण्यासाठी राज्यभर जिल्हा, तालुका पातळीवर बैठका घेऊन अधिवेशन यशस्वी करण्याची भूमिका मांडली. यासाठी राज्यातील तमाम विश्वकर्मा सुतार समाजाचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे सांगून या अधिवेशनासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून सकारात्मक विचाराने प्रतिसाद देणारे व अधिवेशनातही सक्रिय सहभागी होणाऱ्या समाज बांधवांची टीम तयार करण्यात येणार असल्याचे सतीश शिंदे यांनी सांगितले.
यावेळी हनुमंतराव पांचाळ (पुणे) यांनी आपली भूमिका मांडताना सदर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अधिवेशनाचा संदेश प्रत्येक गावात पोहोचविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये असे मेळावे घेण्याचे आवाहन पांचाळ यांनी केले.
यावेळी उपस्थित सर्व बांधवांनी मनोगत व्यक्त करताना  धार्मिक स्थळी अधिवेशन व्हावे यासाठी आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे आद्य संत भोजलिंग काका महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांची समाधी आहे. व त्यांचे संपूर्ण जीवन कार्ये तेथे घडलेले आहे. त्यामुळे आळंदी येथे अधिवेशन आयोजित करण्यात यावे असे एकमताने निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत सुरेश आगलावे, विद्यानंद मानकर, विष्णूपंत पांचाळ, गोपीचंद पांचाळ, रवींद्र रायकर, संदीप दीक्षित महाराज, किस्कींदाताई पांचाळ, समीर भालेकर यांनी अधिवेशन यशस्वी कसे करता येईल यावर मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना मुरलीधर पांचाळ यांनी, या अधिवेशनाला राज्यातील समाज बांधवांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन केले.
या बैठकीचे सूत्रसंचालन प्राध्यापक चंद्रकांत पांचाळ सर यांनी केले.
या बैठकीला अनिल पांचाळ, सुदर्शन बोराडे, मा. भा. प.नंदू महाराज पांचाळ, विष्णूबाप्पा पांचाळ, बळवंत पांचाळ, मुरलीधरराव पांचाळ, भागवत पांचाळ, सुदाम पांचाळ, मल्लिनाथ पांचाळ, संतोष पांचाळ, वीरनाथ पांचाळ, जनार्दन पांचाळ, प्रमोद पांचाळ, हरी पांचााळ, विश्वनाथ पांचाळ, रामनाथराव पांचाळ,  सतीश दीक्षित, दत्तात्रय सुतार आदीसह  राज्यातील विविध जिल्ह्यातील शेकडो समाज  बांधव उपस्थित होते.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles