20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

ज्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला कमी लीड असेल त्या आमदाराला देणार नारळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाजप हायकमांड सतर्क झाले आहे. महाराष्ट्रासह बिहार व इतर काही राज्यांमध्ये जागा कमी होण्याची भीती नेत्यांना सतावू लागली आहे.सातव्या टप्प्यातील मतदान होण्याआधीच पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, अमित शाह आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी गुरूवारी महत्वाची बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत प्रचार संपल्यानंतर देशभरातील भाजपच्या स्थितीचा आढावा घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

भाजप हायकमांड अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसते. पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच शपथ घेणार असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात असला तरी 400 पारचा नारा प्रत्यक्षात येताना दिसत नाही.

सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात बसण्याची शक्यता असल्याची कबुली महायुतीतीलच काही नेत्यांकडून दिली जात आहे. अशा मतदारसंघातील आमदारांना घरी बसवले जाऊ शकते, अशी चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे.

महाराष्ट्रात महायुतीला 30 पेक्षा कमी जागा मिळतील, असा अंदाज आहे. मागील निवडणुकीत हा आकडा 41 होता. त्यामुळे राज्याप्रमाणे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून याची गांभीर्याने दखल घेतली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

भिवंडीतील भाजप खासदार व उमेदवार कपिल पाटील यांनी मतदारसंघातील एका आमदारावर काम न केल्याचे आरोप उघडपणे केले होते. इतर काही मतदारसंघातूनही अशा बातम्या येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी नगरसेवकांची बैठक घेतली होती. तिथे त्यांनी निवडणुकीचे काम न करणाऱ्या दम भरला होता.

निकालानंतर पक्ष नेतृत्वाकडून विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाईल. त्यामध्ये ज्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला कमी लीड असेल, तेथील आमदारांबाबत वेगळा विचार केला जाऊ शकतो. काही आमदारांच्या हाती कमळ काढून नारळ दिला जाईल, अशी जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात खटपट नको, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या निकालाआधीच वात पेटवली आहे. निकालानंतर युतीत आग भडकू शकते. त्याची झळ अनेक आमदारांना सोसावी लागणार असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles