18.9 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

कार्यकारी अभियंत्याच्या घराची झडती; लाखो रुपयांचे घबाड सापडले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड जिल्ह्यात एसीबीकडून दोन वेगवेगळ्या कारवाया झाल्या. यातील एका कारवाईत माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यास लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता लाखो रुपयांचे घबाड आढळून आले आहे. यात रोख रकमेसह काही सोन्या- चांदीच्या वस्तू देखील आहेत.

बीडमध्ये एसीबीच्या कारवाईने भ्रष्टाचाराचे धाबे दणाणले आहे. बीडच्या माजलगाव पाटबंधारे विभाग परळी येथील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर या अधिकाऱ्याला तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती शेतात टाकण्याचा परवानगीसाठी २८ हजाराची लाच घेतांना बीड एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर त्याच्या अंबाजोगाईत येथील किरायाच्या घरी कार्यकारी अभियंता सलगरकर व पंचा समक्ष घर झडती घेतली.

घराच्या झडतीमध्ये ११ लाख ७८ हजार ४६५ रुपये रोख, ३० ग्रॅम सोन्याचे दागिने ज्याची किंमत अंदाजे २ लाख १० हजार रुपये, ३ किलो ४०० ग्रॅम चांदी ज्याची किंमत अंदाजे २ लाख ७२ हजार रुपये आहे. हा सर्व लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles