21.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

बीड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ४१ उमेदवार; १४ उमेदवारांची माघार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारांच्या अर्ज दाखल व माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे बीड लोकसभा मतदार संघाचे चित्र स्पष्ट झाले असून बीडसाठी निवडणुकीच्या रिंगणात आता ४१ उमेदवार असून १४ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता उमेदवारांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात देखील झाली आहे.

बीड लोकसभा निवडणुकीसाठी ७४ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले होते. मात्र अर्जाची छाननी झाली तेव्हा १९ अर्ज बाद झाल्याने ५५ उमेदवार रिंगणात होते. या दरम्यान अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चार पक्षाच्या उमेदवारांसह १० अपक्ष अशा १४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात ४१ उमेदवार आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे, महविकास आघाडीच्या वतीने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांचा समावेश आहे. यामध्ये नोटांचा एक पर्याय असणार आहे. यासाठी एका बूथवर ३ ईव्हीएम लागणार आहे. २५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात २१ लाख ४२ हजार ५४७ मतदारांची नोंदणी झाली असून हे मतदार आपला खासदार निवडणार आहेत.

१३ मे ला होणार मतदान

दरम्यान बीड लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी अवघे १३ दिवस उरले आहेत. आता लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले असून ४१ उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात २ हजार ३५५ मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी २५ ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आलेले आहेत. त्यामध्ये माजलगाव ६, गेवराई ३, परळी ३, केज ४, आष्टी ६ आणि बीड ३ असे चेकपोस्ट आहेत.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles