19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

जरा सबुरीने घ्या, औकात काढलं तर जनता जागा दाखवेल- बजरंग सोनवणे यांचा धनंजय मुंडे यांना इशारा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी थेट पालकमंत्राना आव्हान देत म्हटले की, पालकमंत्री महोदय तुम्ही आमची औकात काढू नका. आमची औकात काय आहे? हे आम्ही दाखवून दिलेले आहे. ज्या स्व. मुंडे साहेबांनी राज्यातील २५ साखर कारखाने यशस्वीपणे चालविले. ते सर्व तुम्ही बहीण भावाने बंद केले. त्यांनी काढलेले तीन साखर कारखाने देखील बंद पाडले. तर मी एक सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या सामान्य व्यक्ती दोन कारखाने यशस्वीपणे चालवीत असून मराठवाड्यात विक्रमी भाव देत आहे. ही आमची औकात आहे. तसेच भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मी मॅनेज नसून मरते दम तक शरद पवार साहेबांच्या विचारांचा पाईक राहील असे अभिवचन बजरंग सोनवणे यांनी दिले.

बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित कार्यकर्त्याच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थीत होते.

पुढें बोलताना बजरंग सोनवणे म्हणले की, आता नेते नव्हे तर जनता आमच्या सोबत असून भाजप सरकार हे सत्तेच्या पाचपट सत्तेचा गैरवापर करीत आहे. निवडणुक ही गैरविश्वासाच्या मुद्द्यावर लढविली जात असून मी मॅनेज असल्याचा माझ्यावर आरोप होतोय. परंतु मी मरते दम तक शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचाराचा पाईक असून मी मॅनेज होणार नाही. असा कार्यकर्त्यांना विश्वास दिला. त्याच बरोबर पालकमंत्र्याचा विधानाचा समाचार घेताना ते म्हणाले की, मी जरूर माझी छाती पडून धनंजय मुंडे आणि अजित दादा हे छातीत असल्याचे म्हणालो परंतु आणखी चार महिन्यानंतर निवडणूक संपल्यानंतर ते दोघेही शरदचंद्र पवार यांच्या पक्षात येतील. परंतु त्यांना पक्षात घ्यायचे किंवा नाही हे आम्ही ठरवू. तसेच अहमदनगर ते परळी रेल्वे मार्ग विषयी बोलताना त्यांनी सांगितले की हा रेल्वे मार्ग २५६ किलोमीटर पासून १५ वर्षां मध्ये केवळ ९९ किलोमीटरचे काम पूर्ण झालेलं आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी २५ वर्षे लागतील. म्हणजे किमान दोन पिढ्या तरी हा रेल्वे मार्ग पूर्ण होणार नाही. परंतु मी निवडून आल्या नंतर अवघ्या दोन वर्षांमध्ये ही काम पूर्णत्वाकडे घेऊन जाईन. त्याच बरोबर राष्ट्रीय महामार्गाची काम १० वर्षांत तरी पूर्ण होऊ शकलेले नाही. या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे २ हजार लोकांची जीव जाऊन अनेकजण जखमी व जायबंदी झालेले आहेत. ज्या पंकजाताई म्हणायच्या की, पुढच्या लोकसभेची निवडणूकीचा अर्ज भरताना मी रेल्वेने फॉर्म भरायला येईन. त्या खरच रेल्वेने उमेदवारी अर्ज दाखल करायला येणार का? असाही प्रश्न त्यांनी पंकजाताई मुंडे यांचे नाव न घेता केला आणि ज्या पंकजाताई म्हणत होते की मी प्रीतमताई चे ताट ओढून घेणार नाही. मग त्यांनी सख्ख्या बहिणीचं ताट का ओढून घेतलं? यासाठी त्यांच्यावर कोणाचा दबाव होता? याचे उत्तर त्यांनी देण्याची मागणी केली. पालकमंत्र्याविषयी बोलताना म्हणाले की, पालकमंत्री जरा सबुरीने घ्या. आमची औकात काढू नका असा इशाराही बजरंग सोनवणे यांनी दिला.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी राज्यातील २६ साखर कारखाने चालवले आणि तीन स्वतः काढले. ते कारखाने बंद करण्याचे पाप या मुंडे कुटुंबीयांनी केले असून मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबद्दल आहे. तरी मी दोन कारखाने यशस्वीपणे चालू मराठवाड्यात सर्वाधिक भाव देत आहे. तसेच जिल्ह्यातील जनतेचा प्रारब्ध ठरविणारा कोणी माईचा लाल जन्माला आलेला नाही. मग तुम्ही प्रारब्ध ठरविणारे कोण ? असाही जळजळ सवाल त्यांनी केला. तसेच टीका करायचे असेल तर होऊन जाऊ द्या. घोडा मैदान जवळ आहे. तसेच मी कशाची शेती करतो? त्याचा तपास करू असं म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना जवाब देत बजरंग बप्पा म्हणाले की माझ्या शेतात काय पिकतं ? आता पर्यंत तुम्ही कसं बघितलं नाही. दुर्बीण लावून बघा. आम्ही पण बघतो. तुम्ही बहिण भाऊ एक झालात पण कार्यकर्त्यांनी काय करायचं ? तसेच मतदारसंघात मी उसाचे राजकारण कधी करणार नाही. असाही शेतकऱ्यांना विश्वास त्यांनी यावेळी दिला.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles