21.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

लोकसभेत पाठवा बीड जिल्ह्याची शान आणि मान उंचावण्याचे काम करीन-पंकजा मुंडे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

आष्टी | प्रतिनिधी

ग्रामविकासमंत्री असताना बीड जिल्ह्यामध्ये विकास निधी देताना कधीही दुजाभाव केला नाही. डोंगरखोऱ्या बरोबर वाडी वस्त्याचाही विकास केला. त्याचबरोबर ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून अनेक लोकहिताचे निर्णय घेऊन थेट शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ मिळवून दिला आहे कोविड काळा मध्येही अनेक वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करून सर्वसामान्य माणसाला जगवण्याचे काम केले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर बीड जिल्ह्याची शान आणि मान उंचावली जावी असेच काम करीन.. तसेच माझ्या दारात आलेल्या माणसांची जात कधीच विचारली नाही आणि यापुढेही असेच काम करत राहील अशी ग्वाही बीड लोकसभेच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रीय समाज पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी दिली.

आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथे धानोरा दौलावडगाव व धामणगाव गटातील कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार सुरेश धस, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे युवा नेते यदत्त समाजसेवक विजय गोल्हार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती राजेंद्र दहातोंडे ,दूध संघाचे माजी चेअरमन संजय गाढवे ,भा ज.पा.आष्टीतालुकाध्यक्ष अँड साहेबराव म्हस्के, भारतीय जनता पार्टीचे अनुसूचितच जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अँड.वाल्मिक निकाळजे,अमोल तरटे,माजी सभापती अशोक इथापे,माजी सभापती अंकुश चव्हाण,माजी उपसभापती राजेंद्र दहातोंडे, पंचायत समिती सदस्य यशवंत खंडागळे,डॉ. शैलेजा गर्जे, एन.टी. गर्जे,रावसाहेब शिरसाट,सरपंच राणी सागर दहातोंडे,दत्तात्रय पोपळे,शरद देसाई, मुरलीधर फसले,आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्रीतम ताईंनी गेल्या दहा वर्षांमध्ये बीड जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामे केली आहेत त्यांच्या विजयाची पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत हॅट्रिक व्हावी ही इच्छा होती मात्र भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने मला उमेदवारी दिली. मी उमेदवारी मागितली नाही. आता तुम्ही प्रीतम या माझ्या लहान बहिणीला जेवढे मताधिक्य दिले त्यापेक्षाही जास्तीचे मताधिक्य मोठ्या बहिणीला देऊन मोठ्या फरकाने विजयी करण्याचे आवाहन केले. मी महाराष्ट्र राज्य शासनात ग्रामविकास मंत्री असताना स्वातंत्र्यानंतर काळात कधीही न झालेल्या ग्रामीण भागामध्ये रस्ते पाणी पुरवठा योजना ग्रामविकास भवन शाळा खोल्या बांधकामे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम यासारखे लोकउपयोगी विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य माणसाचा विकास डोळ्यासमोर ठेवून मी काम करत राहिले. त्यामध्ये पिक विमा, अनुदान ,शिक्षकांच्या बदल्या ,रस्ते ,पाणी आदी प्रश्न सोडवण्यावर भर दिला. सध्या राज्यामध्ये गाजत असलेला आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की आरक्षण हे विधानसभेच्या म्हणजेच राज्याच्या खात्यातील प्रश्न आहे. आमरण उपोषण करण्याने आरक्षण मिळत नसते ते कायदेशीर बाब समजावून घेऊनच आरक्षण मिळत असते.

सध्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही त्यामुळे संसदेतील पहिले भाषण माझे शेतमालाला भाव देण्यावर असणार आहे. विरोधकांवर टीका करताना त्या म्हणाल्या की बजरंग सोनवणे ज्या खात्याचे जिल्हा परिषद मध्ये सभापती होते त्या खात्याची मी मंत्री होते त्यामुळे अधिकाधिक निधी बीड जिल्ह्याला देण्याचे काम मी केले आहे. बीड जिल्ह्यामध्ये माझे पुढील व्हिजन मोठे हॉस्पिटल तयार करण्यावर असून दारात आलेल्या माणसाची मी कधीही जात विचारणार नसल्याची ग्वाही पंकजा मुंडे यांनी दिली. यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की मी 1998 पासून स्वर्गीय मुंडे साहेबांचे नेतृत्वाखाली काम केले आहे. गेल्यावेळी आष्टी मतदार संघातून 71 हजार मतांची लीड प्रीतम मुंडे यांना दिली होती या निवडणुकीतही भरघोस मते देणार आहोत. या डोंगरी भागामधील बांदखेल, वेलतुरी, चिंचेवाडी, जोमदार तांडा इत्यादी रस्त्याचे कामे पंकजाताईंनी ग्रामविकास मंत्री असताना केले असून मोठ्या प्रमाणावर विकास निधी दिलेला आहे. त्याचबरोबर पंकजाताईंकडे महिला व बालविकास मंत्री हे खाते असताना जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. सध्या आष्टी तालुक्यामध्ये जलयुक्त ची कामे मोठ्या प्रमाणावर चालू असून प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याची सोय आता होणार आहे. अहिल्या नगर- दौलावडगाव बीड या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन या रस्त्याची वळणे काढण्याची मागणी ही आमदार धस यांनी पंकजाताई यांच्याकडे केली. मच्छिंद्रनाथ गडावर येणारा लोणी ते मायंबा या सहाशे कोटी रुपये रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याने या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची सोय होणार आहे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले.

संसदेतील माझे पहिले भाषण शेतकऱ्यांसाठी असेल

मि पालकमंञी असतांना जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. जिल्ह्याला विविध योजनेतून निधी उपलब्ध केला. जिल्ह्यात रस्त्याचे जाळे निर्माण केले. विकास कामे करत असतांना कोणताच दुजाभाव केला केला नाही. लोकसभेत गेल्यानंतर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करील. सद्या शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत. संसदेतले माझे पहिले भाषण हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल असा विश्वास पंकजाताई मुंडेंनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

पंकजाताई मुंडे राज्यात महिला व बालकल्याण मंञी असतांना त्यांनी विशेष काम केले. त्यांनी जिल्ह्यात होणार्या स्ञीभ्रृण हत्या थांबण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आज 1 हजार मुलांमागे 985 पर्यंत मुलींचा जन्म दर गेला आहे. पंकजाताईंनी त्याच्या काळात केलेल्या कामाचे फळ असल्याचे आ. सुरेश धस यांनी सांगीतले.

पंकजाताई या महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने त्यांच्यामागे उभे राहणे गरजेचे सर्व गट तट विसरून महायुतीचे धर्म सर्व कार्यकर्त्यांनी सांभाळावा पंकजाताईंना आष्टी विधानसभा मतदार संघातून भरघोस मत देऊन त्यांना विजयी करावे असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष साहेबराव
म्हस्के यांनी उपस्थित मतदारांना केले .

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles