18.2 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

शरद पवारांचा मराठवाड्यात झंझावात; बीडमध्ये तीन सभा घेणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या प्रचार सभांचा मराठवाड्यात सुरू होणार आहे. पुढील आठवड्याच्या 23 तारखेपासून शरद पवार हे मराठवाडा दौऱ्यावर येत असून 25 एप्रिल ते 11 मे दरम्यान शरद पवार यांच्या मराठवाड्यात चार सभा होणार आहेत. पैकी तीन एकट्या बीड जिल्ह्यात तर एक सभा छत्रपती संभाजीनगरात होणार आहे.

बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई तीन विधानसभा मतदार संघात सभा घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होत आहे. म्हणजेच एकाच कुटुंबातील सदस्य ऐकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्यामुळे बारामतीतील निवडणूकीकडे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे.

शरद पवार, अजित पवार हे नेते बारामतीत अडकून पडल्याची टीका होत असतांना आता शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा जाहीर झाला आहे. या दौऱ्यात शरद पवारांच्या मराठवाड्यात चार सभा होणार आहेत. पैकी तीन सभा एकट्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी तर एक सभा छत्रपती संभाजीनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी होणार आहे.

25 एप्रिल रोजी शरद पवारांची पहिली सभा बीड लोकसभा मतदारसंघात माजलगाव येथे होणार आहे. त्यानंतर 1 मे ला छत्रपती संभाजीनगरात शरद पवार सभा घेणार आहेत. त्यानंतर 9 मे रोजी बीडमध्ये तर 11 रोजी अंबाजोगाईत सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यात मतदानाचे तीन टप्पे असून पहिला टप्पा 26 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचा आहे.

दुसरा टप्पा 7 मे ला असून धाराशीव, लातूर या दोन लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. शेवटचा टप्पा 13 मे ला असून जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन मतदारसंघात या दिवशी मतदान होणार आहे. या दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार यासह काँग्रेस नेत्यांच्या सभाही मराठवाड्यात होणार आहेत.

शरद पवारांच्या मराठवाड्यातील सभा

25 एप्रिल बीड (माजलगाव)
1 मे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
9 मे बीड
11 मे बीड (अंबाजोगाई)

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles