-6.6 C
New York
Saturday, February 7, 2026

Buy now

spot_img

उदयनराजे भोसले यांना भाजपकडून साताऱ्यातून उमेदवारी जाहीर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर उदयनराजे भोसले यांना भाजपकडून साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजेंच्या नावाची चर्चा सुरु होती.

उदयनराजे यांनी देखील आपल्यापरीने तयारी सुरु केली होती. अखेर भाजपकडून त्यांना मंगळवारी उमेदवारी जाहीर केली आहे.

साताऱ्यातून लोकसभेसाठी तिकीट मिळावे यासाठी उदयनराजे आग्रही होती. यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. उदयनराजे दिल्ली भेटीनंतर राज्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यात जल्लोष सुरु केला होता. मात्र, तरीही पुढील काही दिवस त्यांच्या नावाची घोषणा झाली नव्हती. त्यामुळे एकप्रकारची धाकधूक त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची बारावी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उदयनराजे यांचे नाव आहे. त्यामुळे अखेर उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे असं म्हणावं लागेल. उदयनराजे यांच्यासमोर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचे आव्हान असणार आहेत. त्यामुळे महायुतीचे उदयनराजे विरुद्ध महाआघाडीचे शशिकांत शिंदे अशी लढत साताऱ्यात पाहायला मिळणार आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles