4.4 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून

- Advertisement -
 अंबाजोगाई | प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या अंबा सह.साखर कारखान्याच्या परिसरात रविवार (दि.१४) रोजी एका तरुणाची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
संजय आत्माराम राठोड (वय ३५, रा. राडी तांडा, ता.अंबाजोगाई) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तो अंबा सह. साखर कारखान्याच्या परिसरात असताना  त्याचा खून केल्याची माहिती समजली. किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वा.रा.ती. रुग्णालयात पाठवून दिला.दरम्यान, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून पोलीस यंत्रणा पुढील तपास करीत आहे.
ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles