19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मराठा आरक्षणासाठी पाटोदा तालुक्यातील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली असून यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

हरिभाऊ पांडुरंग मुंढे (वय 42, रा.पाचंग्री, पाटोदा) हे शेतातील घरी वास्तव्यास होते. शनिवारी रात्री जेवण करून सर्व कुटुंबिय झोपल्यानंतर त्यांनी घरासमोरील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पत्नीला रात्री 10.30 वाजता झोपेतून जाग आल्यामुळे त्या घराबाहेर आली असता हरिभाऊ ने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पाटोदा पोलिसांना याची खबर दिल्यानंतर त्यांनी तात्काळ धाव घेत पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाटोदा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पाचंग्री येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हरिभाऊ मुंढे यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने हरिभाऊ गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होता, समाजासाठी काही तरी केले पाहिजे, असे तो सतत बोलून दाखवत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दरम्यान, एकुलता एक मुलगा असलेल्या हरिभाऊ ने आत्महत्या केल्यामुळे आई-वडिलांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles