20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

बीडमधून उमेदवारीसाठी शरद पवारांकडून ज्योती मेटेंना आमंत्रण 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

 

बीड |

 

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने दुसरी यादी जाहीर करत, महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये, यंदा बीडमधून प्रीतम मुंडेंचं तिकीट कापण्यात आलं असून पंकजा मुंडेंना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे, आता महाविकास आघाडीकडून बीडमधील उमेदवार कोण असणार, याची चर्चा निवडणुकांच्या राजकीय वर्तुळात होत आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय डाव टाकल्याचं दिसून येत आहे. कारण, मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना, मराठा आरक्षणासाठी लढा देणारे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंना बीडच्या मैदानात उतरवण्याची चर्चा सुरू आहे.

 

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून अजित पवार यांचे खंदे समर्थक असल्याने धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. धनंजय मुडे अजित पवारांसोबत गेल्यामुळे, बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या उमेदवारीला बळ मिळालं आहे. स्वत: पंकजा मुंडेंनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे आमच्यासोबत असल्याने आता अधिक मतांनी विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. विशेष म्हणजे ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेटही घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना पंकजा मुंडेंना महाविकास आघाडीकडून तगडा महिला उमेदवार मैदानात उतरवला जाण्याची शक्यता दिसून येते.

 

ज्योती मेटे ह्या शिवसंग्राम संघटेनेचे संस्थापक आणि मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षे लढा देणारे नेते विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत. विनायक मेटेंच्या अपघाती व अकाली निधनानंतर ज्योती मेटेंना विधानपरिषदेवर घेण्यात यावे, अशी मागणीही शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. ज्योती मेटेंनी शिवसंग्रामचं नेतृत्त्व करावं, अशी इच्छाही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली होती. डॉ. ज्योती मेटे या नाशिक येथे धर्मादाय कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मेटे यांच्या निधनानंतर त्या सातत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. आता, त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर पहाटे साडेपाचच्या सुमारास विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला. मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ भातण बोगद्याच्या साधारण १५० मीटर अगोदर विनायक मेटे यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

 

बजरंग सोनवणेही महाविकास आघाडीत?

 

दरम्यान, गतवर्षी पंकजा मुंडेंविरुद्ध लोकसभा लढवणारे धनंजय मुंडेंचे खास असलेले येडेश्वरी शुगर्सचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे यांनीही शरद पवारांची भेट घेतली असून तेही महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचे समजते.

 

मनोज जरांगेही आक्रमक

 

मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन मनोज जरांगे यांनी बीड, जालना, छत्रपती संभाजनगर जिल्ह्यासह महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. निवडणुकांच्या घोषणेपूर्वी सरकारने सगेसोयरेची अंमलबजावणी करावी आणि ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी त्यांची मागणी होती. मात्र, आजच निवडणुकांची घोषणा होणार आहे. तत्पूर्वी बीड जिल्ह्यातील वडवणी येथील सभेच जरांगेंनी भाजपाचा एकही खासदार निवडून न देण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं आहे. त्यामुळे, दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंना महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्यास पंकजा मुंडेंना तगडी लढाई करावी लागू शकते.

 

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles