21.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

निवडणूक कालावधीमध्ये जात, धर्म आणि भाषावार कार्यक्रमांच्या आयोजनांवर  निर्बंध : जिल्हाधिकारी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कार्यक्रम आज जाहीर केला आहे. आजपासून आदर्श आचार संहिता लागु झालेली आहे. बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात, भाषा , धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनावर निर्बंध घालण्यात आले असल्याची माहिती  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली आहे.

 

जिल्हादंडाधिकारी बीड फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन असे आदेश जारी करण्यात आलेले आहे, जिल्ह्यात कुठेही कसल्याही प्रकारचे जात, भाषा , धार्मिक आयोजनावर निवडणूक प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत (दिनांक 06.06.2024 पर्यंत) निर्बंध राहतील.

 

प्रत्येक ईसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशीत केले असून हे आदेश आज शनिवार दिनांक 16.03.2024 रोजीपासून लागु होतील.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles