20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने महिलेनं आपल्याच मुलाचा खून केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड शहरात 14 वर्षीय मुलाचा गळा दाबून आईनेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने आरोपी महिलेनं आपल्याच मुलाचा खून केला. त्यानंतर तीने तो चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. मात्र, शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासात आईनेच मुलाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात एका महिन्याने आरोपी महिलेविरोधात पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीड शहरातील दाऊदपुरा भागात राहणाऱ्या शेख हजान शेख तैवर या मुलाचा २५ जानेवारी २०२४ रोजी मृत्यू झाला होता. त्याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, तो छतावर पतंग उडवत होता. त्यानंतर घरात येऊन तो पाणी प्यायला पाणी पिताच त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला. कुटुंबातील व्यक्तींनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. आरोपी आईने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद पेठ बीड पोलीस ठाण्यात केली होती.

 

दरम्यान या प्रकरणात जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या शवविच्छेदन अहवालात मात्र गळा, नाक दाबल्याने श्वास गुदमरून मुलाचा मृत्यू झाल्याचे नमूद होते. त्यामुळे मुलाचा घातपात झाल्याचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

 

घटना घडली तेव्हा मुलाचा आईशी वाद झाला होता. घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी महिलेकडे अधिक चौकशी केली असता मृत मुलाची आई नाजिया शेखचे हे कारस्थान असल्याचं समोर आलं. अनैतिक संबंधात मुलगा अडसर ठरत असल्याने आईनेच त्याचा गळा आवळून खून केल्या प्रकरणी आई नाजिया विरोधात पेठ बीड पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नाजिया हिने १४ वर्षीय हजान याचा खून केला, तेव्हा घरात ८ वर्षीय दुसरा मुलगा आणि ५ वर्षांची बहीणही हजर होती. त्यांच्यासमोर तिने मुलाचा गळा दाबून त्याची हत्या केली.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles