20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

विधानसभेच्या बाबतीत निर्णय झाल्याशिवाय लोकसभेसाठी काम करणार नाही- शिंदे गटाचे विजय शिवतारे यांचा इशारा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीत मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे. बारामतीत विजय शिवतारे यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. विधानसभा जागा ठरवल्याशिवाय लोकसभेचे काम नाही करणार नाही, नेत्यांनी सांगितले तरी काम कोण करणार नाही, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. विजय शिवतारेंनी बारामतीत मोठा निर्णय जाहीर करत अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

 

विधानसभेच्या भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय लोकसभेबाबत निर्णय नाही, असं विजय शिवतारेंनी एबीपी माझाचे प्रतिनिधी जयदीप भगत यांच्यासोबत बोलताना सांगितलं आहे. विधानसभेच्या भूमिका आज-उद्या स्पष्ट होईल. जोपर्यंत विधानसभेच्या बाबतीत निर्णय होत नाही तोपर्यंत सबुरीची भूमिका घेतल्याचं शिवतारे यांनी सांगितलं आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत स्पष्ट करतील, तेव्हा निश्चितपणे यातून मार्ग निघेल.

 

एकमेकांच्या इंटरेस्टचा विचार नाही केला, तर…’

त्याकाळात पक्ष वेगळे होते, आम्ही राजकीय विरोधक होतो. आता परिस्थिती बदलली आहे. तुम्ही एकमेकांच्या आवडीचे विचार केले तर लोक मदत करतील आणि जर एकमेकांच्या इंटरेस्टचा विचार नाही केला, तर मला वाटत नाही अगदी नेत्यांनी जरी सांगितलं तरी लोक ऐकतील, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे विधानसभेची खात्री देणार असाल तरच लोकसभेसाठी काम करू अशीच सर्व ठिकाणी परिस्थिती असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.

 

जुने सहकारी शरद पवारांची साथ देणार?

 

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जुन्या सहकाऱ्यांची साथ घेत आहेत, या चर्चांवर विजय शिवतारेंनी प्रतिक्रिया देत सांगितलं आहे की, आपल्यासोबत शरद पवार किंवा अजित पवार कुणाचंही बोलणं झालेलं नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. महायुतीत असल्याने अजित पवार यांच्याशी भेटीगाठी होतात, मात्र लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कुणाशी भेटीगाठी किंवा चर्चा झाली नसल्याचं शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे.

 

विधानसभेच्या बाबतीत निर्णय झाल्याशिवाय…

बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या विजय शिवतारे हे पडद्यामागून काम करतात, अशी चर्चा आहे. याशिवाय शरद पवारांनी जुन्या सहकाऱ्यांना साद घालण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीच्या चर्चा देखील आहेत. विधानसभेच्या बाबतीत निर्णय झाल्याशिवाय लोकसभेसाठी काम करणार नाही अशी बारामती मतदारसंघातील नेत्यांची भूमिका असल्याचं विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles