भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभा निवडणुकीसाठी गुजरात आणि महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.तसेच मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनादेखील महाराष्ट्रातून उमेदवारी दिली असल्याच जाहीर केलं आहे.
दुसरीकडे विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता मात्र भाजपने कापलेला आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे तसेच पंकजा मुंडे यांच्या नावाचीही चर्चा होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक, डॉ. जशवंत सलाम परमार यांना गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.



                                    