20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकासह एजंटास अटक 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

ग्रामपंचायतीने ठेवलेल्या गावातील पशुधनाच्या नोंदवहीत नोंद घेण्यासाठी ग्रामसेवकाने तीन हजार रुपयांची मागणी केली. सदरील रक्कम ग्रामसेवक यांच्या सांगण्यावरुन स्वीकारताना खाजगी ईसमास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस ठाणे शिवाजीनगर बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे सासूचे नावे नाविन्य पूर्ण योजना सन 2022 -2023 (दुधाळ गट) अंतर्गत दोन गायी मंजूर झाल्या होत्या. या योजनेअंतर्गत तक्रारदार यांचे सासुने सदर दोन गाई खरेदी केल्या होत्या. सदर गाई दुधाळ गट योजनेअंतर्गत गावात दाखल झाल्याच्या प्रमाणपत्रावर सही करून याची नोंद ग्रामपंचायतीने ठेवलेल्या गावातील पशुधनाच्या नोंदवहीत घेण्यासाठी ग्रामसेवक हरिभाऊ रामभाऊ केदार यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 3000/हजार रुपये लाचेची मागणी करून ते पंचासमक्ष आरोपी खाजगी इसम गणेश माने याने लोकसेवक हरीभाऊ केदार यांचे सांगनेवरुन दिनांक 15/01/2024 रोजी जुनी पंचायत समिती बीड परिसरातील हॉटेलमध्ये स्वीकारले आहे म्हणून त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ग्रामसेवक व खाजगी इसम दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरील कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर, राजीव तळेकर, प्रभारी अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी युनूस शेख, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि .बीड, पर्यवेक्षण अधिकारी – श्री.शंकर शिंदे, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि.बीड, सापळा पथक हनुमान गोरे भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे, ला. प्र. वि.बीड यांनी केली.

नागरिकांना आवाहन 

बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा. तसेच भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास टोल फ्री क्र:- 1064 तसेच मा.पोलीस अधीक्षक, लाप्रवि.छत्रपती संभाजी नगर 9923023361 संपर्कसा धावा.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles