20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

३१ डिसेंबरच्या पार्टीचे आयोजन करायचे तर विशेष परवाना घ्यावा लागणार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

 

बीड जिल्ह्यामध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यामध्ये तीन विशेष पथके स्थापन केलेली असून त्यांच्या माध्यमातून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक तथा विक्री होऊ नये याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच ३१ डिसेंबरच्या पार्टीचे आयोजन करताना एक दिवसीय विशेष परवाना विभागाकडून घेणे आवश्यक आहे. तसे न करता पार्टीचे आयोजन केल्यास संबंधीतांवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ च्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात येईल.

 

तसेच जसे दारु विक्रीसाठी अधिकृत परवान्याची गरज असते तसेच मद्य सेवनासाठी देखील परवाना आवश्यक असतो. असा परवाना हा एक दिवस, एक वर्ष तसेच आजीवन अशा तीन प्रकारात घेता येतो. त्यामुळे मद्य सेवन करणाऱ्यांनी विभागाकडून हा परवाना प्राप्त करुन घ्यावा. तसेच सर्व नागरिकांना व ढाबे चालकांना आवाहन करण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मद्य विक्रीबाबत अधिकृत परवाना असल्याखेरीज कोणत्याही प्रकारची मद्य विक्री अथवा खरेदी तसेच सेवन करण्यात येऊ नये. अन्यथा विभागामार्फत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

 

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती केंद्रे, वाहतूक व विक्रीकडे विभाग लक्ष ठेवून असून त्यावर कारवाई करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. बनावट किंवा अवैध मद्याच्या सेवनामुळे नागरिकांच्या जिवितास हानी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभुमीवर अवैध मद्य निर्मिती, वाहतूक अथवा विक्री संदर्भात तक्रार असल्यास विभागाच्या टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ वर नोंदविण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles